धनश्री-युझीमध्ये सारंकाही आलबेल! कपलचा रोमँटिक किस Video व्हायरल

मुंबई: युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली डान्सर आणि कोरिओग्राफार धनश्री वर्मा (Dhanashree Verma Instagram) आणि भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal Video) यांचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे. हे जोडपं काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांचा घटस्फोट होणार की काय अशाही चर्चा समोर आल्या होत्या. याचं कारण होतं ते म्हणजे धनश्रीचं इन्स्टाग्राम प्रोफाइल.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणाऱ्या धनश्रीनं तिच्या इन्स्टाग्रामवरुन ‘चहल’ हे आडनाव हटवलं. त्यामुळे तिच्या इन्स्टाग्रामवर केवळ ‘धनश्री वर्मा’ दिसल्याने या कपलचे चाहते काळजीत होते. मात्र आता त्यांचा एक अतिशय रोमँटिक व्हिडिओ समोर आल्याने चाहत्यांचाही जीव भांड्यात पडला आहे. अनेकांनी तशा कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.

हे वाचा-सिनेविश्वात चाललंय तरी काय? परदेशींना रोजगार; स्थानिक कर्मचारी मात्र बेरोजगार!

लेटेस्ट रोमँटिक व्हिडिओ शेअर करताना चहलने असं म्हटलं आहे की, ‘ही खंबीर स्त्री माझी ताकद आहे’. धनश्रीनेही तिच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये धनश्री आणि युझवेंद्र यांचा रोमँटिक अंदाजात दिसतायंत. रोमँटिक डेट, मजामस्ती, विनोदी डान्स इ. या जोडीच्या अशा सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आहेत. याशिवाय या व्हिडिओमध्ये युझी त्याच्या पत्नीच्या हातावर आणि गालावर रोमँटिक किसही करतोय. त्यांच्या या रोमँटिक डेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो शेअर करताना त्यांनी ‘देखा एक ख्वाब आणि लैला’ ही इन्स्टाग्रामवर खूप ट्रेंड झालेली गाणी वापरली आहेत.

हे वाचा-प्रियांकाने का दिला शशांकशी लग्नाला होकार? मान्य केलेली प्रत्येक मुलीला आवडेल अशी अट

युझी-धनश्रीमध्ये सर्वकाही ठीक असल्याचं पाहिल्यानंतर चाहत्यांनीही विविध कमेंट्स केल्या आहेत. एका इन्स्टाग्राम युजरने म्हटलं आहे की, ‘अफवांना पूर्णविराम’, आणखी एकाने म्हटलं आहे की, ‘रिलॅक्स बॉइज, सर्वकाही ठीक आहे’. आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता’.


कपलमध्ये काहीतरी बिनसल्याचे समोर आल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी एक रीलही शेअर केले होते. याशिवाय धनश्रीने तिच्या आजाराविषयीही माहिती दिलेली. धनश्रीनं तिच्या पोस्टमध्ये सांगितलेलं, डान्स करताना तिच्या पायाला दुखापत झाली होती. पुन्हा डान्स करण्यासाठी तिला शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. या सर्वकाळात युझवेंद्र तिच्यासोबत असल्याचे तिने स्पष्ट केले होते.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

एकाच दिवशी एकाच मंचावर मराठीतील 7 सिनेमांची घोषणा; पाहा डिटेल्स

मुंबई,  15 सप्टेंबर : कोरोना आणि लॉकडाऊनच्या मोठ्या काळानंतर सिनेसृष्टी पुन्हा जोमानं सुरू झाली आहे. …

विकी कौशलच्या वडिलांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त

मुंबई, 15  सप्टेंबर-   नॉर्वेमधील ओस्लो येथे आयोजित 20 व्या बॉलिवूड महोत्सवात अभिनेता-दिग्दर्शक राहुल मित्रा, …