भुवनेश्वरसमोर अफगाणिस्तानची दाणादाण
203 धावांच्या आव्हान समोर असताना अफगाणिस्तानची पहिल्या ओव्हरपासूनच दाणादाण उडाली. भुवनेश्वर कुमारनं आपल्या स्विंगच्या जाळ्यात पहिल्याच षटकात 2 फलंदाजांना अडकवलं. झाजाई आणि गुरबाज ही सलामीची जोडी पहिल्याच षटकात बाद झाली. त्यानंतर भुवीनं आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये करीम जन्नत आणि नजीबुल्ला झादरानला माघारी धाडलं. त्यानंतर ओमरझाईला बाद करुन भुवीनं टी20 कारकीर्दीतली आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली. भुवनेश्वरनं आपल्या 4 ओव्हरमध्ये एक मेडन ओव्हर टाकत अवघ्या 4 धावात 5 विकेट्स काढल्या. याशिवाय अर्शदीप सिंग, दीपक हुडा आणि अश्विननं प्रत्येकी एक विकेट घेतली.
A massive win for India in Dubai 👏🏻#AsiaCup2022 | #INDvAFG | Scorecard: https://t.co/z8iw8dn85Q pic.twitter.com/rdigrI6H5V
— ICC (@ICC) September 8, 2022
विराटचं विक्रमी शतक
यंदाच्या आशिया चषकात विराटनं याआधी दोन अर्धशतकं झळकावली होती. पण अफगाणिस्तानविरुद्ध विराट एका वेगळ्याच अंदाजात दिसला. रोहित शर्मानं विश्रांती घेतली आणि विराट सलामीला मैदानात आला. या संधीचा फायदा उठवत विराटनं सुरुवातीपासूनच अफगाणी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. विराटनं या सामन्यात 61 चेंडूत नाबाद 122 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. विराटचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे तीन वर्षानंतर झळकावलेलं पहिलंच शतक ठरलं. नोव्हेंबर 2019 साली त्यानं अखेरची शतकी खेळी केली होती. त्यानंतर विराटच्या बॅटमधून धावा निघाल्या पण शतकानं मात्र त्याला हुलकावणी दिली होती. विराटच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं अफगाणिस्तानविरुद्ध 2 बाद 212 धाांवांचा डोंगर उभारला. विराटनं 122 तर लोकेश राहुलनंही 62 धावांचं योगदान दिलं
Published by:Siddhesh Kanase
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या