क्रिती सेनॉन-प्रभास रिलेशनशिपमध्ये? बी-टाऊनमध्ये ‘परमसुंदरी’ आणि ‘बाहुबली’चीच चर्चा!

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि दाक्षिणात्य अभिनेता प्रभास लवकरच ‘आदिपुरुष’ या सिनेमात (Adipurush) एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. अलीकडेच या सिनेमाचं शूटिंगही पूर्ण झालं. दरम्यान या दोघांच्या नव्याकोऱ्या सिनेमाविषयी अपडेट येण्याआधीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चांना उधाण आले आहे. बी-टाऊनमध्ये हे नवं अफेअर सुरू झाल्याची चर्चा (Kriti Sanon and Prabhas Relationship Rumors) आहे. या चर्चची सुरुवात झाली ते करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’च्या अलीकडच्याच एपिसोडपासून.

करणच्या या शोमध्ये एक सेगमेंट असते, ज्याते सहभागी सेलिब्रिटी सिनेइंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींना कॉल करून ‘hey Karan, its me’ बोलायला सांगतात. या सेगमेंटमध्ये क्रितीने प्रभासला कॉल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडिओ शेअर करत या नव्याने सुरू होणाऱ्या रिलेशनशिपविषयी भाष्य केले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘आदिपुरुष’ सिनेमाच्या सेटवर पहिल्या दिवसापासूनच या दोघांमध्ये चांगले बाँडिंग पाहायला मिळाले. तसा लाजाळू असणारा प्रभास क्रितीशी दिलखुलास बोलत असल्याने अनेकांना आश्चर्यही वाटलेले.

हे वाचा-वडिलांचं निधन आणि उद्ध्वस्त झालं कुटुंब; १९८४ च्या दंगलीत अभिनेत्रीने गमावलं सर्वकाही!

या दोघांमध्ये मैत्रीपलीकडे नाते असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय चाहत्यांनाही या दोघांना एकत्र पाहायचे आहे. मात्र क्रिती किंवा प्रभास यांच्यापैकी कुणीही स्पष्टपणे नात्याची कबुली दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याविषयी ठोस अशी माहिती समोर आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्यांनी या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान खूप वेळ एकत्र घालवला असून, एखादा सीन रीटेक करण्यासही त्यांची ना नव्हती. याशिवाय सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतरही त्यांचे बाँडिंग कायम आहे.


हे वाचा-एक दिवस सुट्टी घ्या सर… वाढदिवशी शाहरुख खानने पंतप्रधान मोदींना दिला असा सल्ला

दरम्यान अशी माहिती मिळाली आहे की आदिपुरुष या सिनेमात प्रभास ‘राम’ ही भूमिका साकारत असून क्रिती ‘सीता’ या भूमिकेत आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. त्यातच आता या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा होत असल्याने त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठीही चाहत्यांना उत्सुकता आहे. ओम राऊत या मराठमोळ्या दिग्दर्शकाने या सिनेमाचं दिग्दर्शन केल आहे. क्रिती-प्रभास यांच्यासह अभिनेता सैफ अली खान, सनी सिंग हे देखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सलमानच्या १५० एकरात पसरलेल्या अलिशान फार्महाऊसची किंमत आहे तरी किती?

Salman Khan Panvel Farm House: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलमधील फार्म हाऊसवर …

Amitabh Bacchan ने पुन्हा खरेदी केलं आलिशान घर; किंमत ऐकूण डोळे होतील मोठे

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमुळे खूप चर्चेत …