BCCI मध्ये सौरव गांगुलीची दुसरी इनिंग सुरू, सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या सेकंड इनिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या कार्यकाळ वाढवण्यासंबंधीच्या संविधान संशोधनाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता सौरव गांगुली आणि जय शाह त्यांच्या पदावर कायम राहतील.
बीसीसीआयवर जेव्हा प्रशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती, तेव्हा लोढा समितीने बीसीसीआयचं नवीन संविधान लिहिलं, ज्यात प्रशासकांना तीन वर्षांचा कुलिंग ऑफ पिरेड देण्यात आला. या संविधानानुसार सौरव गांगुलीला त्याचं अध्यक्षपद सोडावं लागलं असतं, कारण बीसीसीआयचा अध्यक्ष होण्याआधी सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचाही अध्यक्ष होता. तीन वर्षांच्या कुलिंग ऑफ पिरेडला काढून टाकण्यासाठी बीसीसीआयने संविधानामध्ये संशोधन केलं, ज्याला सुप्रीम कोर्टाकडून मान्यता मिळाली आहे.
कुलिंग ऑफ पिरेडसाठीची नवीन व्यवस्था बनवण्याचा प्रस्ताव आम्ही देत आहोत. कोणताही सदस्य लागोपाठ दोन वेळा राज्य क्रीडा संघ किंवा बीसीसीआयमध्ये पदावर राहू शकतो, पण त्यानंतर त्याला कुलिंग ऑफ पिरेडचं पालन करावं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
सौरव गांगुली 2019 साली बीसीसीआयचा अध्यक्ष झाला, त्याच वर्षी त्याचा कार्यकाळ संपणार होता. 2020 साली कोरोना महामारीमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाली नाही, ज्यामुळे सौरव गांगुलीचा कार्यकाळ आणखी एक वर्ष वाढवण्यात आला.

Published by:Shreyas

First published:

Tags: BCCI, Sourav ganguly, Supreme court

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

IND vs AUS : हार्दिक आणि भुवी यांना ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतून का वगळलं, जाणून घ्या खरं कारण

मुंबई : हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले …

योगायोग… भारताला पहिला T 20 world cup जिंकवून देणाऱ्या मॅचविनरची आजच्या दिवशीच निवृत्ती

नवी दिल्ली : आजच्या दिवस साधत भारताला पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून देणाऱ्या खेळाडूने निवृत्ती घेतली …