दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसची तब्बल आठ तास चौकशी

मुंबई,14  सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आज दिल्लीत चौकशीसाठी हजर झाली होती. दिल्लीतील मंदिर मार्गावर स्थित असलेल्या दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात अभिनेत्रीची चौकशी झाली आहे. एक नाही दोन नाही तब्बल आठ तास जॅकलिनची चौकशी करण्यात आली आहे. जॅकलिन फर्नांडिसची आज दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ₹ 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. ती सकाळी 11.30 वाजता तपास संस्थेच्या मंदिर मार्ग कार्यालयात आली होती आणि आता रात्री 8 च्या पर्यंत तिची चौकशी झाली आहे.

जॅकलिन फर्नांडिसची ही चौकशी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केली जात आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरने 200 कोटींचा गंडा लावल्याचा आरोप आहे. त्याने फोर्टेस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंह यांच्या पत्नीकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर काही बॉलिवूड अभिनेत्रींच्या संपर्कात असल्याचा खुलासा झाला होता. यामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीचं नाव प्रामुख्याने पुढं आलं होतं.
हे वाचा: दिल्ली पोलिसांकडून जॅकलिन फर्नांडिसची चौकशी सुरु; काय आहे नेमकं प्रकरण?
त्यानंतर सतत या दोघींची चौकशी होत असते. दरम्यान अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि सुकेशचे अनेक खाजगी फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये सुकेश आणि जॅकलिनची जवळीकता पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. तपास एजन्सीने असा दावा केला की सुकेश फर्नांडिसला सुकेशचा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग आणि तो विवाहित होता हे माहीत होते, परंतु तिने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी आर्थिक व्यवहार केले.

त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासेदेखील झाले होते. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं होतं. इतकंच न्हे तर आपल्या एका सुपरहिरोवर आधारित चित्रपटात जॅकलिनला त्याने मुख्य भूमिकेत घेण्याचं आश्वासनही दिल्याचं समोर आलं होतं. आरोपपत्रानुसार जॅकलिन फर्नांडिसने पाच घड्याळे, 20 दागिने, शूजच्या 65 जोड्या, 47 कपडे, 32 बॅग, 4 हर्मीस बॅग, नऊ पेंटिंग्ज आणि एक व्हर्साचे क्रॉकरी सेट भेट म्हणून स्वीकारल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. अभिनेत्रींच्या चौकशीतून काय माहिती समोर आली हे लवकरच समजेल.

Published by:Nishigandha Kshirsagar

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

VIDEO पाहून तुमच्याही अंगात संचारेल; ‘मराठी पोरगी’ने अख्ख्या देशाला लावलंय वेड

मुंबई, 21 सप्टेंबर :  सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या …

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …