उर्वशी रौतेला उगीचच नसीम शाहच्या मागे लागली नव्हती, जाणून घ्या किती आहे प्रॉपर्टी….

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहवर फिदा झाली होती. त्यावेळी उवर्शी ही रिषभ पंतला सोडून नसीम शाहच्या मागे का लागली, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता नसीम शाहची प्रॉपर्टी नेमकी किती आहे आणि तो किती डॉलर कमावतो, हे आता समोर आले आहे.

नसीम हा सध्याच्या घडीला पाकिस्तान संघातील सर्वा युवा खेळाडू आहे. उंचपुरा नसीम हा फक्त क्रिकेटपटू नाही तर तो एक मॉडेलही आहे. त्यामुळे नसीमकडे सध्याच्या घडीला बरेच करार आहेत आणि त्यामधून तो कोट्यवधी रुपये कमावतो. त्याचबरोबर नसीम फक्त पाकिस्तानपुरता मर्यादीत नाही तर तो इंग्लंडमध्ये जाऊनही कौंटी क्रिकेट खेळतो. सध्या नसीम हा १९ वर्षांचा आहे. पण १९ व्या वर्षात त्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

किती आहे नसीम शाहची प्रॉपर्टी, जाणून घ्या…
नसीमने १९ व्या वर्षी आतापर्यंत भरपूर पैसे कमावले आहेत. आतापर्यंत नसीमची प्रॉपर्टी ही १० मिलियन डॉलर एवढी आहे. त्याचबरोबर नसीमचे बरेच करार आता सुरु झाले आहेत. त्यामुळे त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत वाढणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडमध्येही तो क्रिकेट खेळता, त्यामुळे तिथेही तो वास्तव्याला असतो. त्यामुळे तिथेही त्याला काही करार मिळू शकतात. त्यामुळे जर १९व्या वर्षीच नसीमने एवढी संपत्ती कमावली असेल तर यापुढे त्याच्याकडे अजून किमान १० वर्षे तरी क्रिकेटची आहेत. त्याचबरोबर नसीम हा वारसा हक्काने आलेल्या घरात राहतो आणि ते फारच सुंदर आहे, असे म्हटले जाते. हे सर्व पाहूनच उर्वशी नसीमवर भाळली, अशी चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.

नेमकं घडलं तरी काय होतं…
नसीम शाह सध्या त्याच्या गोलंदाजीपेक्षा फलंदाजीमुळे जास्त चर्चेत आहे. नसीमने आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीत सलग दोन षटकार मारून संघाला अफगाणिस्तानविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. हा सामना पाकिस्तानी संघाने तर जिंकलाच पण त्यासोबतच भारतालाही अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले. नसीमचा हा दमदार खेळ पाहून मिस इंडिया राहिलेली बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाही तिची फॅन झाली आणि तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ स्टोरीही शेअर केली. त्यानंतर नसीम शाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते म्हणतात की उर्वशी कोण आहे आणि तिने कोणता व्हिडीओ टाकला हे मला माहीत नाही, असे तो म्हणाला होता.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

आता ठरलं… अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाला अलविदा केल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेत खेळणार

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबईच्या संघाला सोडचिठ्ठी दिली होती. पण …

BCCI मध्ये सौरव गांगुलीची दुसरी इनिंग सुरू, सुप्रीम कोर्टाकडून ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय …