आता ठरलं… अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या संघाला अलविदा केल्यानंतर पहिल्यांदा कोणत्या स्पर्धेत खेळणार

नवी दिल्ली : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने मुंबईच्या संघाला सोडचिठ्ठी दिली होती. पण त्यानंतर अर्जुन नेमकं काय करणार, तो कोणत्या स्पर्धेत खेळणार, असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण आता अर्जुन तेंडुलकरचं ठरलं आहे. अर्जुन आता कोणत्या स्पर्धेत खेळणार आहे आणि ही स्पर्धा कधी सुरु होणार आहे, ही माहिती आता समोर आली आहे. कारण अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या संघाने दोन वर्षे लिलावामध्ये आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते, पण त्याला एकही संधी दिली नव्हती. पण आता अर्जुन बीसीसीआयच्या एका स्पर्धेत उतरणार आहे.

अर्जुनने मुंबईच्या संघाला अलविदा केला होता. त्यानंतर तो गोव्याच्या संघाकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अर्जुन आता गोव्याच्या संघाकडूनच खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकर २२ सप्टेंबरपासून येथे होणाऱ्या २७व्या अखिल भारतीय जेपी अत्रेय स्मृती क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. संघटन सचिव सुशील कपूर यांनी बुधवारी ही माहिती दिली. या स्पर्धेत १६ संघ भाग घेतील, ज्यांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे.

गोवा क्रिकेट असोसिएशन, खिलाडी अकादमी इलेव्हन दिल्ली, एचपीसीए, जेकेसीए, मिनर्व्हा क्रिकेट अकादमी, यूटीसीए चंदीगड, खिलाडी इलेव्हन बिहार, बडोदा क्रिकेट असोसिएशन, आरबीआय मुंबई, पीसीए कोल्ट्स आणि एमपीसीए यासारख्या संघ स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेचे समन्वयक विवेक अत्रेय म्हणाले, “पंजाब क्रिकेट असोसिएशन व्यवस्थापन, चंदिगड केंद्रशासित प्रदेश क्रीडा विभाग आणि हरियाणा क्रीडा विभाग यांच्या मदतीने आणि सहकार्याने, आम्ही सहा ठिकाणी ३१ सामने आयोजित करण्यासाठी १२ दिवस भरवू शकलो आहोत.”

भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) शी संलग्न असलेल्या या स्पर्धेत १०० हून अधिक खेळाडू खेळले आहेत, ज्यांनी नंतर भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. पंजाबचे माजी पोलीस महासंचालक आणि स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्र शेखर यांनी सांगितले की, विजेत्या संघाला दोन लाख तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

जय हो… विश्व अजिंक्यपद स्पर्धेत विनेश फोगटने पटकावले कांस्यपदक, ठरली पहिलीच भारतीय

नवी दिल्ली : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली …

उर्वशी रौतेला उगीचच नसीम शाहच्या मागे लागली नव्हती, जाणून घ्या किती आहे प्रॉपर्टी….

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला ही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहवर फिदा …