विनेशने २०१९ साली झालेल्या नूर-सुलतान, कझाकस्तान येथे कांस्यपदक जिंकले होते. यावेळी कांस्यपदकाच्या फेरीत माल्मग्रेनचा ८-० असा पराभव केल्यामुळे विनेशला हे पदक पटकावता आले. तिने मंगळवारी तिच्या पहिल्या लढतीत २०२२ च्या आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या मंगोलियाच्या खुलन बटखुयागकडून पराभूत झाल्यानंतर रेपेचेज फेरीद्वारे कांस्य प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला होता. तीनवेळा राष्ट्रकुल स्पर्धा जिंकलेल्या विनेशने बटखुयाग अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर रिपेचेज फेरीत प्रवेश केला.
रेपेचेज फेरीत, विनेशने प्रथम कझाकस्तानच्या झुलदीझ एशिमोव्हाला व्हिक्ट्री बाय फॉल (४-०) च्या निर्णयात हरवले आणि नंतर तिची प्रतिस्पर्धी अझरबैजानची लेला गुरबानोव्हा दुखापतीमुळे कांस्यपदकाच्या फेरीत जाण्यासाठी पुढे न आल्याने पुढची चढाओढ जिंकली. माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता अंशू मलिकच्या अनुपस्थितीत विनेश सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार होती. गतविजेत्या जपानच्या अकारी फुजिनामीने दुखापतीतून माघार घेतल्याने तिला स्पर्धेतही अनुकूल बरोबरी मिळाली. मात्र, पात्रता फेरीतच विनेशचा पराभव झाला.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये विनेशने तीन सुवर्ण जिंकले आहेत. तिने २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात आणि २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० किलो वजनी गटात कुस्तीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर यंदाही विनेशने राष्ट्रकुल स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी २०१९ नूर सुलतान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्याने कांस्यपदक जिंकले होते. विनेश ही दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेती आहे. तिने २०१९ च्या जकार्ता आशियाई खेळांमध्ये सुवर्ण आणि २०१४ इंचॉन आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकले. याशिवाय विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सात पदके जिंकली आहेत. त्यांनी एक सुवर्ण (२०२१), तीन रौप्य (२०१५, २०१७, २०१८) आणि चार कांस्य (२०१३, २०१६, २०१९, २०२०) जिंकले आहेत. तिने २०१३ जोहान्सबर्ग युथ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्यामुळे आता यापुढे विनेशची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या