मुंबईतील लघुबाद न्यायालयात 7 वी ते 10 वी पाससाठी नोकरीची संधी…पगार 69000 पर्यंत

नोकरीच्या शोधात असलेल्या 7 वी ते 10 वी पास उमेदवारांसाठी संधी चालून आलीय. लघुबाद न्यायालय, मुंबई येथे ग्रंथपाल, चौकीदार, सफाई कामगार या पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Small cause Court Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 असणार आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) ग्रंथपाल ( Librarian)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना लायब्ररी सायन्समध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

२) चौकीदार (Watchman)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे

हेही वाचा :  UKPSC Recruitment 2023 – Openings for 18 Principal Posts | Apply Online

३) सफाई कामगार (Sweeper)
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे

वयो मर्यादा :

उमेदवार, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता १८ वर्षापेक्षा कमी वयाचा आणि ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा आणि अनूसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा महाराष्ट्र शासनादवारे २८.०३.२०१८ रोजी त्यावेळेपुरत्या विनिर्दिष्ट केलेल्या विशेष मागासप्रवर्गाकरिता ४३ वर्षापखा जास्त वयाचा नसावा.

पगार :

१) ग्रंथपाल ( Librarian) – 21,700/- – 69,100/- रुपये प्रतिमहिना

२) चौकीदार (Watchman) – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना

३) सफाई कामगार (Sweeper) – 15,000/- – 47,600/- रुपये प्रतिमहिना

उमेदवारांकरिता महत्त्वाच्या सूचना :

हेही वाचा :  इंडियन बँकेत 12वी पाससाठी भरती, दरमहा 63,840 पगार मिळेल..

पात्र उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातच अर्ज भरावा.

अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाचा उल्लेख बंद लिफाफ्यावर ठळक अक्षरात करून अर्ज प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०० ००२ यांचेकडे पाठवावेत.

एका उमेदवारास वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावेत. एकाच अर्जावर तीनही पदे किंवा एकाच लिफाफ्यावर तीनही पदे लिहून पाठविल्यास ते रद्द समजले जाईल.

उमेदवाराने आपले अर्ज लघुवाद न्यायालय, मुंबई यांच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घेवून, केवळ (ए-४) आकाराच्या चांगल्या दर्जाच्या कागदावर सुस्पष्ट व सुवाच्च अक्षरात भरुन, नोंदणीकृत पोच डाकेने म्हणजेच (RPAD) किंवा शीघ्र डाकसेवेन (Speed Post) पोचपावतीसह प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४००००२ या पत्त्यावर (सुट्टीचे दिवस वगळता) दिनांक ०४/०४/२०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहचतील अशा बेताने पाठवावे.

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : प्रबंधक, लघुवाद न्यायालय,लोकमान्य टिकल मार्ग, धोबी तलाव, मुंबई – 400 002.

हेही वाचा :  PNB : पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 240 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022

अधिकृत संकेतस्थळ : districts.ecourts.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे पण वाचा :

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

गावची लेक फौजदार बनते तेव्हा साऱ्या गावाला अभिमान वाटतो; वाचा अश्विनीच्या यशाची कहाणी !

MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, …

NCERT मार्फत विविध पदांसाठी भरती ; पगार 60000 पर्यंत मिळेल..

NCERT Recruitment 2024 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची …