Stock Market Today: शेअर मार्केटमध्ये उसळी की मंदी? Gujrat- Himachal Results च्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या स्थिती

Stock Market Today: आज सकाळपासून गुजरात निवडणूकांच्या निकालांना (Gujrat Assembly Elections Results 2022) सुरूवात झाली आहे. त्यातून जागतिक बाजारात अनेक चढउतारही सुरू झाले आहेत. कच्च्या तेलाच्या (crude oil) किंमती कमी झाल्याचा परिणामही जागतिक बाजारावर सुरू झाला आहे. अमेरिकन शेअर मार्केटही सध्या सपाट असून सिंगापूर एक्सचेंजही (SGX) वाढू लागले आहे. त्यातून पुढच्या वर्षी जागतिक मंदीचं वारं असल्या कारणानं शेअर मार्केटवर सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या सगळ्या चढउतारासोबत आजच्या गुजरात निवडणूकांच्या निकालाचा शेअर मार्केटवर (Share Market Today) काय परिणाम होईल हेही पाहणे आज महत्त्वाचे ठरणार आहे. (Stock Market Today on the eve of Gujarat himachal Asselmbly Election Result 2022 know the latest updates)

गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. अमेरिकन शेअर बाजार दोन दिवसांच्या घसरणीनंतर सपाट बंद झाला. बाँड मार्केट अमेरिकेतील मंदीकडे बोट दाखवताना दिसतंय. त्यामुळे इक्विटीबाबत (equity) गुंतवणूकदारांच्या होल्डिंगवर परिणाम झाला आहे. SGX निफ्टी सध्या 12 अंकांच्या वाढीसह 18683 च्या पातळीवर आहे. इतर आशियाई बाजारांबद्दल (asian share market) बोलायचे झाले तर जपानच्या निक्केईमध्ये 0.83 टक्क्यांची घसरण आहे. कोरियाचा KOSPI सपाट आहे. डॉलर निर्देशांक 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 105.15 च्या पातळीवर पोहचला आहे. दिवसभराच्या व्यवहारात तो 105 च्या खाली आला. त्याच वेळी ब्रेंट क्रूड ऑईल (कच्च्या तेल)  2.47 टक्क्यांनी घसरून 77 डॉलरवर पोहोचले आहे.  

हेही वाचा :  निवडणुका टाळण्यासाठी मंत्रालयात दोन दिवस धावपळ

आवर्जून वाचा – LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | भाजप 34, काँग्रेस 33 जागेवर आघाडी

काय असेल आजची स्थिती? 

भारतीय शेअर मार्केट गुरुवारी कमकुवत जागतिक संकेतांचा मागोवा घेतील अशी अपेक्षा आहे. दलाल स्ट्रीटने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा बारकाईने मागोवा घेतला आहे. बेंचमार्क निर्देशांक – बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 – सिंगापूर ट्रेड केलेल्या SGX निफ्टी फ्युचर्सवरील ट्रेंड दर्शविल्यानुसार खाली उघडण्यासाठी सेट आहेत. बुधवारी सेन्सेक्स 215.68 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 62,410.68 वर बंद झाला तर 50 समभागांचा निफ्टी 50 82.25 अंकांनी किंवा 0.44 टक्क्यांनी घसरून 18,560.50 वर बंद झाला.

आवर्जून वाचा – LIVE Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये भाजप – 123, काँग्रेस – 42 तर आप – 3

आशियाई बाजार निक्केई 225 बरोबर 219.41 अंकांनी किंवा 0.79 टक्क्यांनी घसरून 27,467 वर व्यापार करत होते तर शांघाय कंपोझिट 12.91 अंकांनी 0.40 टक्क्यांनी घसरून 3,199.62 वर व्यापार करत होते.

यूएस फ्रंटलाइन निर्देशांक कमकुवत संपले आणि डाऊ 30 33,597.90 वर बंद झाला तर S&P 500 7.34 टक्के किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 3,933.92 वर स्थिरावला. नासदाक कॉम्पोझिट (Nasdaq Composite) 50 अंकांनी किंवा 0.51 टक्क्यांनी घसरून 10,958.50 वर बंद झाला.

हेही वाचा :  Indian Railway मध्ये AC कोच कायम ट्रेनच्या मध्यभागीच का असतो?

यूएस 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 3.451 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. डॉलर निर्देशांक 105.5 च्या आसपास घसरत आहे तर कच्च्या तेलाची घसरण सुरूच आहे कारण ब्रेंट USD 78 वर घसरला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …