Sharmila Tagore : सिनेमात काम करण्यासाठी शर्मिला टागोरांनी सोडलं शिक्षण

Sharmila Tagore : 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांची गणना बॉलिवूडमधील लिजेंड अभिनेत्रींच्या यादीत केली जाते. सिनेमांपेक्षा शर्मिला त्यांच्या लूक आणि अदांमुळे नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. आज शर्मिला टागोर त्यांचा 78 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

वयाच्या 13 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण

शर्मिला टागोर शाळेतून घरी परतत असताना सत्यजित रे यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या घरापर्यंत त्यांचा पाठलाग केला. आपल्या सिनेमात शर्मिला यांनी काम करावं अशी इच्छा असल्याचं त्यांनी शर्मिला यांच्या वडिलांना सांगितलं. त्याकाळी सिनेमात काम करण्यासाठी महिलांना घरातून परवानगी मिळत नव्हती. पण शर्मिला यांच्या वडिलांनी सिनेमात काम करण्यासाठी त्यांना होकार दिला. अशाप्रकारे सत्यजित रे यांच्या ‘अपूर संसार’ (Apur Sansar) या बंगाली सिनेमाच्या माध्यमातून वयाच्या तेराव्या वर्षात त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 

सिनेमात काम करताना शर्मिला यांचे अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. शूटिंगमुळे त्यांना दररोज शाळेत जायला जमत नसे. त्याकाळी सिनेमात काम करणं वाईट असल्याचा समज होता. शर्मिला यांचा हिरॉईन असण्याचा परिणाम इतर विद्यार्थ्यांवर होऊ शकतो त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना शाळा सोडण्यास सांगितले होते. पुढे महाविद्यालयात गेल्यावरदेखील त्यांना या अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयातील शिक्षकांनीदेखील त्यांना अभिनय किंवा शिक्षण काहीतरी एक निवडण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचे शिक्षकांसोबत जोरदार भांडण झाले. अभिनयापायी त्यांनी शिक्षकांसमोर पुस्तके फाडली आणि शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. 

हेही वाचा :  'नाटू नाटू' गाण्याची निर्मिती कशी झाली? जाणून घ्या...

पहिलाच सिनेमा सुपरहिट!

शर्मिला यांनी सहा बंगाली सिनेमांत काम केल्यानंतर हिंदी-सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘कश्मीर की कली’ (Kashmir Ki Kali) या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमातील शम्मी कपूर (Shammi Kapoor) आणि त्यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमात त्यांनी ‘चंपा’ ही भूमिका साकारली होती. 

News Reels

शर्मिला यांनी ‘वक्त’, ‘अनुपमा’, ‘देवर’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आराधना’, ‘मालिक’, ‘छोटी बहू’, ‘राजा रानी’ अशा अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. राजेश खन्ना (Rajesh Khanna) व्यतिरिक्त शशी कपूरसोबत (Shashi Kapoor) त्यांची जोडी अधिक पसंत केली गेली. शर्मिलाची एकूण संपत्ती 2700 कोटी आहे. 

शर्मिला आणि मंसूर अली खान पटौदी (Mansoor Ali Khan Pataudi) यांची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे. त्यांच्या लग्नासाठी दोघांच्याही घरातून विरोध होता. 
शर्मिला बोल्ड अभिनेत्री असण्यासोबत तिचे विचार खूपच पुढारलेले असल्याने मंसूर अली खान पटौदी यांच्या घरातून त्यांच्या नात्याला खूप विरोध होत होता. पण तरीही त्यांनी 1968 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतरही त्यांनी आपला सिनेसृष्टीतील प्रवास कायम ठेवला. 

हेही वाचा :  या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 'फर्जी' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

संबंधित बातम्या

Birthday Special | सर्व चौकटी मोडून चित्रपटात स्विमसूट घालणाऱ्या बॉलिवूडमधील पहिल्या अभिनेत्री शर्मिला टागोर

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …