शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी

Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. दरम्यान, आजचा वर्धापन दिन चर्चे आहे तो नव्या बदलामुळे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत नवे बदल केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे बदल करण्यात आले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरुन चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या राजीनामा परत घ्या, याच्या दबावामुळे पवार यांनी आपला निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनात मोठा धक्का दिला. त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे. 

प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. 

हेही वाचा :  महाराष्ट्रातील 'या' स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या; धनंजय मुंडे यांनी धाडलं पत्र

यानंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना देखील कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे.  तर सुनील तटकरे यांना राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले आहे.  जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘Double Digit पगारवाढीचा एकमेव मार्ग म्हणजे..’; Appraisals बद्दल कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सल्ला

Double Digit Appraisal Salary Hike: सध्या कॉर्पोरेटमध्ये वार्षिक आढावा म्हणजेच अ‍ॅन्यूअल रिव्ह्यू आणि पगारवाढ निश्चित करण्याचा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …