आयुष्यात खूप काही कमावलं, पण शेवटी एकाकीच मरण आलं! वाचा अभिनेत्री परवीन बाबींबद्दल..

Parveen Babi : बॉलिवूडच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या परवीन बाबी (Parveen Babi) यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जुनागढमध्ये झाला होता. परवीन बाबी यांची 19 वर्षांची बॉलिवूड कारकीर्द होती आणि या वर्षांत त्यांनी खूप नाव कमावले. परवीन जितक्या चित्रपटांमुळे चर्चेत असायच्या, त्यापेक्षाही त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. परवीन यांचे नाव नेहमीच कोणा ना कोणाशी जोडले जात होते. पण त्यांच्या शेवटच्या वेळी कोणीही त्यांच्यासोबत नव्हते.

परवीन बाबी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1972मध्ये मॉडेलिंगपासून केली आणि लगेचच त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळाले. 1970 ते 1980 दरम्यान परवीन यांनी ‘दीवार’, ‘नमक हलाल’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘शान’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. परवीनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आठ चित्रपटांमध्ये काम केले असून, हे सर्व चित्रपट हिट किंवा सुपरहिट ठरले. प्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री होण्याचा मानही परवीन बाबी यांनी मिळवला होता. 70च्या दशकातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक त्या होत्या.

लव्ह लाईफही गाजली!

70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोग्पा आणि परवीन बाबी 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर ते वेगळे झाले. यानंतर परवीन बाबींचे हृदय प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांच्यावर आले. दोघांच्या नात्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या, मात्र पुन्हा एकदा त्यांचे मार्ग वेगळे झाले. 1977 मध्ये, परवीन त्यांच्या अभिनय कारकिर्दीच्या शीर्षस्थानी होत्या, तेव्हा त्या महेश भट्ट यांच्या प्रेमात पडल्या. मात्र, त्यावेळी महेश यांचे लग्न झाले होते, तरीही दोघे लिव्ह-इनमध्ये राहिले आणि नंतर महेश परवीनला सोडून पत्नीकडे परतल्याने हे नाते तुटले.

हेही वाचा :  Kamlesh Sawant : साळगावकरला मारहाण केल्याने चाहते गायतोंडेवर संतापले

शेवटच्या क्षणी दुरावस्था!

परवीन बाबी यांना गंभीर मानसिक आजार जडला होता, त्यामुळे त्या सर्वांपासून दूर गेल्या. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासल्याचे सांगितले जाते. 20 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले. तीन दिवस त्यांचा मृतदेह पलंगावर पडून होता. तीन दिवस त्यांच्या दाराजवळ ब्रेड आणि दुधाचे सामान पडून होते, तेव्हा लोकांनी पोलिसांना कळवले. मात्र, तोपर्यंत त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …