‘इस्लाममध्ये लिव्ह-इनमध्ये राहणं चुकीचं’, हायकोर्टाने फेटाळली मुस्लीम तरुणासह राहणाऱ्या हिंदू तरुणीची याचिका

Court News: अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठाने (Lucknow Bench) इस्लाममध्ये लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहणं आणि शारिरीक संबंध प्रस्थापित करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने हिंदू तरुणीच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लाममध्ये (Islam) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं असल्याचं सांगितलं. पोलीस आपला छळ करत असल्याचा आरोप करत प्रेमी युगुलाने सुरक्षेची मागणी केली होती. पण कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. 

अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाच्या न्यायाधीश संगीता चंद्रा आणि नरेंद्र कुमार जौहरी यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी  कोर्टाने याचिका फेटाळताना सांगितलं की, ही एक सामाजिक समस्या आहे जी सामाजिक पद्धतीनेच दूर केली जाऊ शकते. यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याची कोणतीही गरज नाही. 

29 वर्षीय हिंदू तरुणी आणि 30 वर्षीय मुस्लीम तरुणाने ही याचिका केली होती. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. तरुणीने याचिकेत आरोप केला होता की, पोलीस तिला त्रास देत आहेत. त्यामुले आपल्याला सुरक्षा दिली जावी. तरुणीच्या आईनेही पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, जिचा उल्लेख याचिकेत करण्यात आला होता. यानंतर पोलिसांवर त्रास दिल्याचा आरोप करत सुरक्षेची मागणी करण्यात आली. आपली आई या नात्यावर खूश नसल्याचं तरुणीने यावेळी सांगितलं.

हेही वाचा :  "तुला इस्लाम माहिती नाही का?," डिनरसाठी एकत्र आलेल्या हिंदू तरुण आणि मुस्लीम तरुणीला मारहाण; मदत करणाऱ्यांना भोसकलं

याचिकेत लग्नाचा उल्लेख नाही – कोर्ट

कोर्टाने याचिकेचा उल्लेख करत म्हटलं की, यामध्ये याचिकाकर्त्यांनी भविष्यात लग्न करण्याची इच्छा आहे किंवा करणार आहोत याचा कुठेच उल्लेख केलेला नाही. इस्लामनुसार, लग्न केल्याशिवाय शारिरीक संबंधांना मान्यता दिली जाऊ शकत नाही. याशिवाय इस्लामामध्ये लग्नाआधी आकर्षण, सेक्स, स्पर्श, चुंबन या गोष्टी हराम आहेत. 

कोर्टाने सांगितली कुराणमध्ये लिहिलेली शिक्षा

कोर्टाने सांगितलं की, पत्नी-पत्नी वगळता कोणत्याही प्रकारचा सेक्स किंवा शारिरीक संबंधाला कायदेशीर मान्यता नाही. कोर्टाने हेदेखील सांगितलं की, जर कोणी असं करत असेल कुराणमध्ये तरुणाला 100 फटके आणि महिलेला मरेपर्यंत दगडाने ठेचण्याची शिक्षा असल्याचं सांगितलं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Godrej Family Tree : लहानपणी तुमच्याही घरात असेल या कंपनीचे कपाट, आता 14 लाख कोटींची कंपनी

देशातील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक असलेले गोदरेज कुटुंब आज तब्बल 127 वर्षांनंतर विभक्त होणार आहे. …

‘असा कसा डॉक्टर बनणार रे तू?’; छोट्या भावाला डॉक्टर बनवण्यासाठी मोठा भाऊ देत होता परीक्षा

Fraud in NEET 2024: देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॅशनल एलिजिबीलीटी एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. …