IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी20 सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IND vs SL, 2nd T20 Live Streaming : वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिल्यानंतर श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्यास टीम इंडिया सज्ज झाली आहे.  धर्मशाला मैदानावर भारताचा दुसरा टी20 सामना होणार आहे. पहिला सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत आघाडी घेतली आहे. तीन सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. तर श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरले.

लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतानं 62 धावांनी श्रीलंकेला पराभूत केलं. या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. धर्मशालाच्या हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे.  

कोणाचं पारड जड?
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत भारतानं सर्वाधिक विजय मिळवले आहेत. तर, श्रीलंकेच्या संघानं भारताविरुद्ध निराशाजनक कामगिरी केलीय. भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने खेळण्यात आले. यापैकी 15 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, सात सामन्यात पराभावाची धुळ चाखली आहे. 

दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड संघाबाहेर – 
 टीम इंडिया एकापाठोपाठ एक विजय संपादन करत आहे. वेस्ट इंडिजला 3-0 च्या फरकाने धूळ चारल्यानंतर श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. एकीकडे संघ दमदार कामगिरी करत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामी फलंदाज मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आला आहे. मयांकला बॅकअप सलाम फलंदाज म्हणून बोलवण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मयांक टीम इंडियात दाखल झाला आहे.

हेही वाचा :  भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य

भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण –
ऋतुराज गायकवाडआधी दुखापतीमुळे उपकर्णधार के.एल राहुल आणि वॉशिंगटन सुंदर श्रीलंका मालिकेला मुकले आहेत. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि दीपक चाहरला दुखापतीमुळे मालिका अर्ध्यावर सोडावी लागली होती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …