कंगना रणौतचा शो ‘लॉक- अप’च्या अडचणी वाढल्या, मेकर्सच्या विरोधात तक्रार दाखल


सध्या चर्चेत असलेला ‘लॉक- अप’ हा शो काही कारणांनी कायदेशीर अडचणीत सापडला आहे.

अभिनेत्री कंगना रणौत होस्टिंग करत असलेला ‘लॉक-अप’ रिअलिटी शो मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. या शोमध्ये कोण सहभागी होणार तसेच शोचं स्वरुप कसं असणार आहे. या सर्वच गोष्टींचा सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच आता या शो कायदेशीर अडचणीत अडकल्याचं बोललं जातंय. एकीकडे असा शो प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिला नसेल असा दावा मेकर्स करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शोच्या विरोधात एका बिझनेसमनने तक्रार दाखल केली आहे.

हैदराबाद येथील बिझनेसमन सनोबर बेग यांच्या म्हणण्यानुसार हा शो त्यांची रजिस्टर्ड संकल्पना ‘द जेल’वर हा शो आधारित आहे. त्यांनी या शोची संकल्पना एंडेमोल शाइन इंडियाच्या अभिषेक रेगे यांच्यासोबत शेअर केली होती. मात्र फसवणूक करुन त्याची ही संकल्पना चोरल्याचं सनोबर बेग यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या दिवाणी न्यायालयानं लॉकअपच्या मेकर्सना या शोचं स्ट्रिमिंग कोणत्याही प्लॅटफॉर्मवर न करण्याचे आदेश दिले आहेत.

सनोबर बेग यांनी सांगितलं की, ‘एका आठवड्यापूर्वी जेव्हा मी या शोचा प्रोमो पाहिला तेव्हाच मी न्यायालयात धाव घेतली. निर्मात्यांनी केवळ माझी संकल्पनाच चोरलेली नाही तर त्यांनी जेलरपासून ते सेट डिझाइन पर्यंत सर्वच गोष्टी कॉपी केल्या आहेत. सध्या दिवाणी न्यायालयानं शोच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. मी लढण्यासाठी तयार आहे. न्याय मिळवण्यासाठी मला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागलं तरीही चालेल.’

हेही वाचा :  “शिवसैनिक संजय राऊत यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही”; मास्टरस्ट्रोक म्हणत नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

दरम्यान ‘लॉकअप’च्या निर्मात्यांचा दावा आहे की, अशाप्रकारचा शो प्रेक्षकांनी आतापर्यंत कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पाहिला नसेल. हा एक सेलिब्रेटी रिअलिटी शो असणार आहे. ज्यात एकूण १६ सदस्य, ७२ दिवसांसाठी लॉकअपमध्ये बंद असणार आहेत. या शोचं होस्टिंग अभिनेत्री कंगना रणौत करणार आहे. त्यामुळेच हा शो सध्या सोशल मीडियावर जास्त चर्चेत आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …