दुबई, 1 सप्टेंबर : आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) बांगलादेशचं (Sri Lanka vs Bangladesh) आव्हान पहिल्या राऊंडमध्येच संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा 2 विकेटने पराभव झाला. बांगलादेशने दिलेलं 184 रनचं आव्हान श्रीलंकेने 19.2 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून पार केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये लंकेला विजयासाठी 8 रनची गरज होती, तेव्हा महीश तीक्षणाने लेग बाईजची एक रन काढली, यानंतर दुसऱ्या बॉलला असिथा फर्नांडोने फोर मारली. यानंतर मेहदी हसनने तिसरा बॉल नो बॉल टाकला, ज्यावर फर्नांडोने दोन रन केल्या आणि लंकेला विजय मिळवून दिला.
बांगलादेशच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने सर्वाधिक 60 रन केले. याशिवाय दासुन शनाकाने 45 आणि पथुम निसांकाने 20 रनची खेळी केली. बांगलादेशकडून अफिफ हुसैनने 39, मेहदी मिराझने 38, महमदुल्लाहने 27 तर कर्णधार शाकिब अल हसन आणि मोसदेक हुसैन यांनी प्रत्येकी 24-24 रन केले, ज्यामुळे बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 183/7 पर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेकडून हसरंगा आणि करुणारत्नेला प्रत्येकी 2-2, तर मधुशंका, तीक्षणा आणि फर्नांडोला 1-1 विकेट मिळाली. बांगलादेशच्या इबादोत हुसैनने 3 विकेट घेतल्या. तर तस्कीन अहमदला 2 आणि मुस्तफिजुर रहमान आणि मेहेदी हसनला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
ग्रुप बीच्या टीम ठरल्या
श्रीलंकेच्या या विजयामुळे आशिया कपच्या सुपर-4 राऊंडच्या बी ग्रुपच्या टीम ठरल्या आहेत. अफगणिस्तान आणि श्रीलंका सुपर-4 राऊंडसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. अफगणिस्तानने ग्रुप बीमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव केला होता, त्यामुळे त्यांचं सुपर-4चं स्थान आधीच निश्चित झालं होतं. श्रीलंका-बांगलादेश यांच्यातली विजयी टीम सुपर-4 ला जाणारी ग्रुप-बी मधली शेवटची टीम ठरणार होती, यात श्रीलंकेने बाजी मारली.
भारताचंही स्थान निश्चित
दुसरीकडे ग्रुप-ए मधून भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव केल्यामुळे त्यांचही सुपर-4 चं स्थान निश्चित झालं आहे. आता पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातल्या सामन्यात ज्याचा विजय होईल ती टीम सुपर-4 मध्ये पोहोचणारी अखेरची टीम ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Asia cup
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या