मुंबई, 21 सप्टेंबर : बॉलिवूडमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं निधन झालं. राजू श्रीवास्तव यांच्या निधनातून बॉलिवूड सावरत नाही तर दुसरीकडे अभिनेते अशोक कुमार यांची मुलगी अभिनेत्री भारती जाफरीचं निधन झालं आहे. 20 सप्टेंबरला भारतीनं अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारानं तिचं निधन झालं आहे. भारतीवर मुंबईच्या चेंबूर येथे अंतिम संस्कार करण्यात आले. अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास यांनी ही माहिती दिली. भारती यांच्याबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा देत नंदिता दास भावुक झाल्या. भारती जाफरी यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
भारती यांच्याविषयी बोलताना नंदिता दास भावुक होत म्हणाल्या, भारती जाफरी चैतन्यशील आणि आनंदी व्यक्ती होती. भारतीनं लोकांना दिलेलं प्रेम कोणीही विसरू शकत नाही. आम्हाला नेहमी तिची आठवण येत राहिल.
टेलीचक्करनं दिलेल्या वृत्तानुसार, नंदिता दास यांनी मुलाखतीत म्हटलं, अनुराधा पटेल आणि कंवलजीत सिंह माझे फॅमिली फ्रेंड आहेत. भारती ताईनं तिच्या वैचारिक स्वभावानं आम्हाला भरपूर प्रेम दिलं. ती नेहमी माझ्या वाढदिवसाला मला शुभेच्छा द्यायची. मला तिची खूप आठवण येईल. ती खूप प्रतिभाशाली अभिनेत्री होती आपल्याला विसरुन चालणार नाही.
बॉलिवूड अभिनेता आणि भारती यांचा नवरा कंवलजीत सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भारतीच्या निधनाची माहिती दिली. सोबत भारतीचा फोटो देखील शेअर केला. आमची प्रेमळ, भारती जाफरी, मुलगी, बहिण, पत्नी, आई, ताई, काकू, शेजारी, मैत्रीण आणि आमची प्रेरणा 20 सप्टेंबरला आम्हाला सोडून गेली, अशी भावूक पोस्ट त्यांनी शेअर केली.
भारती जाफरीनं हजार चौरासी की मां, सास, दमन आणि देवी अहिल्या बाई सारख्या सिनेमात काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या