अभिनेता इम्रान हाशमीवर दगडफेक; जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग संपल्यानंतर बाहेर…

श्रीनगर, 19 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपट ‘ग्राउंड जीरो’ च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. शूटिंगचं सर्व काम पहलगाम येथे सुरू आहे. मात्र येथे इम्रान हाशमीवर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शूटिंग संपल्यानंतर हाशमी सेटच्या बाहेर गेले होते, तेव्हा एकाने त्यांच्यावर दगडफेक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी शूटिंग संपल्यानंतर इम्रान चित्रपटाच्या इतर टीमसोबत पहलगामच्या मार्केटमध्ये गेले होते. त्यावेळी काही अनोळखी लोकांनी अभिनेत्यासह त्याच्यासोबत इतरांवर हल्ला केला. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक करणाऱ्यांविरोधात कलम 147, 148, 370, 336, 323  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अनंतनाग पोलिसांनी एका व्यक्तीची ओळख पटवली असून त्याला अटक केली आहे. इम्रान हाशमीचा चित्रपट ग्राऊंड जीरो बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF च्या जवानावर आधारित आहे. या चित्रपटातील अधिकतर सीन पहलगाम येथे शूट केले जात आहे. यापूर्वी श्रीनगरमध्ये चित्रपटाची शूटिंग सुरू होती. यादरम्यान अभिनेता 14 दिवसांपर्यंत श्रीनगर येथे होते.

Published by:Meenal Gangurde

First published:

Tags: Bollywood actor, Imran khan

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

हार्दिक अक्षयाच्या केळवणाला सुरूवात; लग्न उरकून लगेच बिग बॉसमध्ये एंट्री

मुंबई, 21 सप्टेंबर : तुझ्यात जीव रंगलाची हिट जोडी म्हणजे सगळ्यांच्या लाकड्या पाठक बाई आणि …

आधी आलिशान कार आणि आता गोव्यात घर; कमी वयात तेजस्वीच्या कमाईची होतेय चर्चा

मुंबई, 21  सप्टेंबर : तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री सध्या जिकडेतिकडे गाजत आहे. जेव्हापासून या अभिनेत्रीने …