MahaGenco Job:महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बंपर भरती, मराठी तरुणांना सरकारी नोकरीची संधी

MahaGenco Recruitment: विद्युत वितरण क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरच्या एकूण ३३० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरच्या एकूण ७३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल/मॅकेनिकल/इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रीकल ॲण्ड पॉवर इंजिनीअरिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित कामाचा किमान नऊ वर्षाचा अनुभव असावा.

अॅडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरच्या एकूण १५४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल/मॅकेनिकल/इन्स्ट्रूमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रीकल ॲण्ड पॉवर इंजिनीअरिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित कामाचा किमान सात वर्षाचा अनुभव असावा.

डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरच्या एकूण १०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल/मॅकेनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअर/पॉवर इंजिनीअरिंग/इलेक्ट्रीकल ॲण्ड पॉवर इंजिनीअरिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी पूर्ण असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.

Collector Office Job: जिल्हाधिकारी कार्यालयात परीक्षा न देता नोकरी, ४५ हजारपर्यंत मिळेल पगार
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

११ ऑक्टोबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज
आता तुम्हालाही लावता येईल पावसाचा अंदाज, हवामान खात्यात नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

Teachers Salary: पालिका शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, वेतनकोंडीतून होणार सुटका

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडविभागातील महापालिका शिक्षक आणि महापालिका, नगर परिषद, नगरपालिका शाळांतील सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी …

दप्तराचे ओझे विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा अधिक, शाळेने आणली टर्म बुक संकल्पना

म. टा. वृत्तसेवा, कल्याणविद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे त्यांच्या वजनापेक्षा अधिक वाढले असून हे ओझे कमी करण्याची …