सोमवार २ मे २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून या सुट्टीचा कालावधी रविवार १२ जून २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार १३ जूनपासून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार म्हणजेच २७ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत.
इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वी चा निकाल दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी किंवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत जाहीर होईल. हा निकाल विद्यार्थी/पालकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहणार आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांतून उन्हाळयाची आणि दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळ यासारख्या सणांवेळी सुट्टी घेता येणार आहे. माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार, शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांना घ्यावी लागणार आहे.
आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होणार आहेत.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या