Breaking News

चेहऱ्यावरील पिंपल्सवर करा योगाने मात , बाबा रामदेवांनी सांगितली आसने

आहारातील बदलेल्या सवयी आणि असंतुलित जीवनशैलीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. या गोष्टीचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेवर फोडे आणि पिंपल्स देखील येतात. बदलत्या हवामानाचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. अशातच त्वचेवर पिंपल्स येण्याची समस्या अधिक वाढते.

त्वचेवर फोड आणि पिंपल्स हे बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतात. त्यामुळे, स्वच्छतेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठीच बाबा रामदेव यांनी काही योगासने सूचवली आहे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती आसने
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

​कपालभाती

कपालभाती केल्याने पिंपल्सपासून सुटका मिळण्यासाठी मदत होते, असे बाबा रामदेव सांगतात. रोज कपालभाती केल्याने शरीरातून अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शरीरातून बाहेर पडतो. त्याच प्रमाणे रक्त देखील शुद्ध होते, ज्यामुळे त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. कपालभाती केल्याने पचनक्रिया देखील सुधारते आणि ब्लड सर्क्युलेशन देखील वाढते, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतात.

कसा कराल कपालभाती

दोन्ही पायांना आराम मिळेल अशा स्थितीत बसावे. एक लांब श्वास घेवून श्वास सोडावा, श्वास घेण्यावर महत्व न देता श्वास सोडण्यावर ध्यान केंद्रित करावे. श्वास घेतांना पोटातील आतडी फुगली पाहिजे या गोष्टी कडे लक्ष द्या.

(वाचा :- प्रियांका चोप्राचे लॉस एंजेलिसमधील अलिशाल घर, पण तिच्या चेहऱ्यावरील चमक घरा पुढेही फिकी)

​उत्तानासन

अनेकदा ताण तणावामुळे देखील पिंपल्स होतात. उत्तानासन केल्याने शरीर ताणले जाते आणि मुत्रपिंड आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते. रोज हे योगासन केल्याने मुरुमांची समस्याही दूर होऊ शकते, तसेच या योगासनामुळे हार्मोन्स संतुलित राहतात, ज्यामुळे त्वचारोग दूर होण्यास मदत होते.

असे करा उत्तानासन

दोन्ही हात शरीरालगत ठेवावेत. आता उजवा पाय ६० अंश इतका वर आणावा. यावेळी पाय ताठ ठेवावेत. काही सेकंद थांबून पाय हळूहळू खाली आणावा.

(वाचा :- World Coconut Day: नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावण्याचे आश्चर्यकारक फायदे,आता टॅनिंगची समस्या होणार कायमची दूर)

​शिर्षासन

शिर्षासन केल्याने शरीरातील रक्तप्रवाह बरोबर राहतो. याशिवाय दररोज सुमारे 10 मिनिटे हा योग केल्याने त्वचेच्या समस्येसोबतच सुरकुत्याची समस्याही दूर होते. हे योगासन चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासही मदत करते.

असे करा शिर्षासन

गुडघे सरळ करून कंबर वर उचलावी व पाय एकेक करून चेहऱ्याकडे आणावेत जेणेकरून धड थोडे मस्तकापलीकडे झुकेल. यामुळे दोन्ही पाय आपोआप वर उचलले जातील. या स्थितीत शरीराचा तोल सांभाळावा. काही सेकंद स्थिर राहून पाय पूर्णपणे सरळ करावेत व पूर्ण शरीरही सरळ ठेवावे.

(वाचा :- गेलेले केस पुन्हा येतील व हेअरफॉल पूर्णपणे थांबेल, करीनाची डाएटिशियन ऋजुताने सांगितले केसांसाठी 3 घरगुती पदार्थ)

​या सोप्या मार्गानी मिळवा मुक्ती

  • तुमची स्किन खूप नाजूक आहे त्यामुळे घरातून बाहेर पडताना. सूर्यापासून संरक्षण टाळण्यासाठी सनस्क्रीन लावा. सूर्याचे नुकसान आणि उष्णता संवेदनशीलता होऊ शकते. सूर्यप्रकाशामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते यामुळे चेहऱ्यावर मुरुम येऊ शकता.
  • आहारात असलेले बदलामुळे मुरुम निर्माण होतात. परंतु जास्त साखर असलेले अन्न, दूध किंवा तळलेले पदार्थ देखील मुरुमांना निमंत्रण देतात. त्यामुळे तुम्ही काय अन्न खाता या गोष्टकडे लक्ष द्या. त्यामुळे तुमची त्वचा चांगली होण्यास मदत होईल.

(वाचा :- पार्लरमध्ये जायला वेळ नाही? मग या साणांच्या दिवसात घरीच करा मेनिक्युअर, जाणून घ्या प्रत्येक स्टेप)

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

IIT Bombay मध्ये डर्टी पिच्चर! विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडीओ बनवल्याने एकाला अटक

IIT Bombay MMS Scandal: पंजाबमधील चंदीगड विद्यापीठातील MMS Scandal वाद थंड होत असतानाच आता IIT …

मजबूत व 100 पेक्षा जास्त वर्षे आयुष्य जगण्यासाठी करा ही 6 कामे

या जगातील प्रत्येक माणसाला निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असते. दीर्घ आयुष्य जगण्याचे अनेक मार्ग आहेत. …