बिग बॉस मराठी 4 सुरू होतंय, पण कधी? बघा मांजरेकरांचा नवीन प्रोमो

मुंबई,  27 ऑगस्ट: टेलिव्हिजनचा सर्वाधिक टीआरपी असलेला बिग बॉस मराठी हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  पहिल्या 3 दमदार सीझननंतर चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठी 4 चं सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र बिग बॉस मराठी 4 चा पहिला प्रोमो काही दिवसांआधीच प्रदर्शित झाला आणि महेश मांजरेकरचं सूत्रसंचालन करणार यावर शिक्का मोर्तब झाला. सूत्रसंचालन ठरला चौथ्या पर्वाची संभाव्य यादी देखील समोर आली पण चौथा सीझन कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. प्रेक्षकांची प्रतिक्षा आणखी ताणून  बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. चौथा सीझन कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनच्या दुसऱ्या प्रोमो महेश मांजरेकर त्यांचा नवा स्वॅग घेऊन पुन्हा दमदार आवाजात घोषणा करताना दिसत आहेत.  महेश मांजरेकर प्रोमोमध्ये म्हणतायत, ‘हिची ना कायम किरकीर असते,  हा किती भांडतो, सर तिच्यावर कायम चिडतात, हा सरांचा फेव्हरेट आहे. ही माझी नाही तुमची मत आहेत.  बिग बॉस मराठी 4 सुरू होतंय. तुमची मत तयार ठेवा’. महेश मांजरेकरांचा नवा दमदार प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.  चौथा सीझन नक्कीच धमाकेदार आणि नव्या तगड्या स्पर्धकांनी भरलेला असणार आहे हे नक्की झालं.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 4: ‘या’ दिवशी सुरू होणार बिग बॉस मराठीचा चौथा सीझन; कोण असणार स्पर्धक?

बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचे दोन प्रोमो प्रदर्शित झाले पण सीझन कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर चौथा सीझन सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 25 सप्टेंबरला सुरू होण्याची शक्यता आहे.  कलर्स मराठीवरील सुर नवा ध्यास नवा हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे 24 सप्टेंबरला कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडू शकतो.

चौथा सीझन सुरू होताच प्रेक्षकांना धम्माल राडा पाहायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यावेळी वेगळ्या स्टाइलनं स्पर्धकांची फुल टू शाळा घेताना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीचा पहिला सीझन अभिनेत्री मेघा धाडे जिंकली होती. तर दुसरा सीझन शिव ठाकरे आणि तिसरा सीझन अभिनेता विशाल निकमनं जिंकला होता. आता चौथा सीझन कोण जिंकणार हे पाहणंही महत्त्वाचं आणि एंट्रेस्टिंग ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1
Previous पहिल्याच सामन्यात मोठा धक्का… श्रीलंकेच्या फलंदाजांची हाराकिरी, अफगाणिस्तानचा मोठा विजय
Next कपडे धुतल्यानंतर खाली राहिलेल्या Detergent पावडरचा ‘असा’ करा घरगुती उपयोग

Check Also

भारतातील kiss चा तो किस्सा आणि King Charls… आजही लोकांच्या चांगलाच लक्षात

मुंबई 20 सप्टेंबर : राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यनंतर आता इंग्लंडचे ‘प्रिंस ऑफ वेल्स’ चार्ल्स तिसरे …

सोनम कपूरच्या चिमुकल्याचं नाव आहे खूपच युनिक; वाचून तुम्हालाही वाटेल हेवा

मुंबई, 20 सप्टेंबर :  बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला …