भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर एका सामन्यापूर्वी मयांतीने वसिमला एक प्रश्न विचारला. खरंतर वसिमला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतं. तो या प्रश्नाचे उत्तर द्यायला टाळत होता. पण मयांतीला तरीही त्याची या प्रश्नावर कमेंट मागितली आणि त्यानंतर वसिम भडकलेला पाहायला मिळाला.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये हा सामना होणार होता. पण या सामन्यावर प्रश्न विचारण्यापेक्षा मयांती त्याला भारताबाबत काही प्रश्न विचारत होती, त्यामुळे चो यावेळी चिडला होता. यावेळी वसिम म्हणाला की, ” रोहित शर्माही आता त्याला स्वतःला संपूर्णवेळ टीव्हीवर पाहून कंटाळला असेल. आज दोन वेगळ्या टीम खेळत आहेत. काल मी भारताबद्दल दिवसभर बोललो. आज पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान आहे.” खरं तर मयांती आणि रोहित यांचे काही कनेक्शन नाही, पण चिडल्यावर वसिमच्या तोंडून रोहितचे नाव येऊन गेले. वसिम यावेळी चिडला होता, कारण त्याने यापूर्वी भारताच्या कामगिरीबद्दल बरीच चर्चा केली होती. त्यामुळे अजून याबाबत बोलण्यासारखे काहीच नव्हते. पण तरीही मयांती त्याला भारतीय संघाबाबत प्रश्न विचारत होता आणि वसिम त्यामुळे चिडल्याचे पाहायला मिळाले.
यापूर्वी संजय मांजरेकरने याबाबत उत्तर दिले होते आणि संजयनेही असेच उत्तर मयांतीला दिले होते. त्यामुळे हे उत्तर दिल्यावर आता तू संजयला विचार, असं वसिम मयांतीला म्हणाला. समालोचन करत असताना एकच प्रश्न जर बराचवेळ्या विचारला गेला तर एखाद्या व्यक्तीचा तोल जाऊ शकतो आणि हेच वसिमबाबतही पाहायला मिळाले. एकच प्रश्न वारंवार विचारल्यामुळे वसिम यावेळी वैतागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वसिमचे वागणे स्वाभाविक होते, अशीच चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या