ट्विटरवर परत येताच केआरकेनं त्याच्या ट्विटमधून मी बदला घेण्यासाठी परत आलोय असं म्हटलंय. त्यानंतर त्यानं स्वत: चं 10 किलो वजन कमी केल्याची माहिती दिली. त्यानंतर आता केआकेनं तो लवकरच राजकारणात सक्रीय होणार असल्याची माहिती दिली आहे. ‘मी लवकरच राजकारणात एंट्री करणार आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी नेता होण्याची गरज आहे अभिनेता नाही’. केआरकेच्या या ट्विटनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा – Karan Johar: रिलेशनशिपमध्ये होता करण जोहर; पहिल्यांदाच व्यक्त केलं ब्रेकअपचं दुःख
I am considering to join a political party soon. क्योंकि देश में सुरक्षित रहने के लिए, नेता होना ज़रूरी है, अभिनेता नहीं!🙏🏼🌹
— KRK (@kamaalrkhan) September 15, 2022
केआरकेनं तो राजकारणात सक्रीय होणार असल्याची घोषणा केली आहे मात्र तो कोणत्या पक्षात जाणार हे त्यानं सांगितलेलं नाही. तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची सिनसृष्टीशी निगडीत वादग्रस्त वक्तव्य थांबणार नाहीत हे नक्की. स्वत:ला फिल्म क्रिटिक म्हणवून घेणारा केआरके नेता बनण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं आहे.
जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याच्या अटकेला निर्माता करण जोहर जबाबदार असल्याचं त्यानं म्हटलं होतं. करणनं त्याच्या लेटेस्ट सोशल मीडियावर अपडेटमध्ये त्याच्या अटकेला करण जोहर, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांना काहीही घेणं देणं नसल्याचं म्हटलं आहे. केआरके जेलमधून परत आल्यानंतर फिल्म रिव्ह्यू देण्याऐवजी ट्विटरवर पोस्ट शेअर करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या