आपल्या प्रेमापासून दूर जाऊन पाहा, उर्वशी रौतेलानं शेअर केली पोस्ट; नेटकऱ्यांना आठवला ऋषभ पंत

मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. कधी ऋषभ पंतवरून तर कधी पाकिस्तानी गोलंदाज नसीम शाहवरून. शिवाय ती सोशल मीडियावरही सतत काही ना काही पोस्ट करत असते. आताही तिची एक पोस्ट खूप व्हायरल झाली आहे.

उर्वशीची पोस्ट चर्चेत
आपल्या इन्स्टाग्रामवरर उर्वशीनं एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती नाॅन ग्लॅमरस अवतारात आहे. साडी नेसलीय. गळ्यात मंगळसूत्र आहे. हा फोटो शूटिंगच्या सेटवरचा असावा. तिनं केस मोकळे सोडले आहेत.

‘प्रिन्स’ सूरज पवारला होऊ शकते अटक, शिर्डीत केली फसवणुक

उर्वशीनं यावर एक कॅप्शन लिहिली आहे. तिनं लिहिलं आहे, ‘ मृत्यूच्या आधी आणखी एक मृत्यू होतो, तुम्ही तुमच्या प्रेमापासून दूर जाऊन पाहा.’ या पोस्टवर चर्चा झाली नसती तरच नवल! अनेकांनी यावर ऋषभ पंत असं लिहिलंय. अनेकांना वाटत आहे की ही पोस्ट ऋषभला उद्देशूनच लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशीनं ऋषभ पंतला छोटू भय्या म्हटलं होतं. ‘छोटू भय्याला बॅट बॉल खेळायला हवं. तुझ्यासाठी बदनाम व्हायला मी काही मुन्नी नाही. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा,’ असं उर्वशीनं पोस्टमध्ये म्हटलं होतं. उर्वशीची पोस्ट बघता बघता व्हायरल झाली. कधीकाळी उर्वशी आणि ऋषभ पंतच्या अफेअरच्या चर्चा असताना उर्वशीनं ऋषभला थेट रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत त्याचा उल्लेख छोटू भय्या केल्यानं तिची पोस्ट चर्चेचा विषय ठरली.

राखी सावंतच्या रोमँटिक सीनवरून भडकला आदिल, मारामारीपर्यंत गेलं प्रकरण

आताही तिनं एक पोस्ट शेअर करत म्हटलं की मी ऋषभ पंतला साॅरी म्हटलं नाही. तर माझ्या फॅन्सना म्हटलं आहे. आता अभिनेत्रीचं नाव दुसऱ्या एका क्रिकेटरसोबत जोडलं जात आहे आणि तोही चक्क एक पाकिस्तानी क्रिकेटर! उर्वशीने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबतचा (Naseem Shah) एक व्हिडिओ एडिट करून शेअर केला होता. त्यानंतर तिला ट्रोलिंगची शिकारही व्हावे लागले.

तर अलिकडेच नसीमलाही उर्वशीच्या या व्हिडिओबाबत विचारणा केली असता, त्याने उत्तर दिले होते की तो उर्वशीला ओळखत नाही. मात्र आता उर्वशीला इन्स्टाग्रामवर उर्वशीला फॉलो केल्याने नसीम चर्चेत आला आहे.

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

केबीसी’च्या सेटवर आले जुळे भाऊ; ओळख पटण्यासाठी बिग बींनी केलं असं काही

मुंबई, 15 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या …

जेलमधून बाहेर येताच KRK मोठी घोषणा; करणार राजकारणात एंट्री

मुंबई, 15 सप्टेंबर : स्वत:ला फिल्म क्रिटीक म्हणून घेणारा केआरके म्हणजेच कमाल रशिद खान काही …