शैक्षणिक गुणवत्ता वृध्दि वर्ष सन २०२२-२३ अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम शाळा शाळांमध्ये राबविले जात आहेत. मुंबईतल्या हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत सहशालेय उपक्रम राबविण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावदेण्यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण निरीक्षक नवनाथ वणवे सरांनी आपल्या विभागातील अनेक शैक्षणिक संस्थांमधील मुख्यध्यापक व शिक्षकांमध्ये संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी उत्तमोत्तम स्पर्धाचे आयोजन करून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये चेतन्य निर्माण केले. केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक व प्रयोगशाळा सहाय्यक यांनी विज्ञान प्रदर्शनात सादर केलेले प्रकल्प करोनानंतर उल्लेखनीय होते. या प्रदर्शनात प्रथम पुरस्कार प्राप्त प्रयोग शाळा सहाय्यक हितेंद्र राठोड यांचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे, विद्यार्थ्यांची अध्ययन वृद्धी करण्यासाठी राज्य स्तरावरून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी साठी मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येणार आहे.
सहशालेय उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी फारच उपयुक्त ठरतील. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व मोबाईलपासून दूर राहण्यासाठी अशा स्पर्धा नेहमीच प्रेरणादायी ठरतील असे मत ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केले. या स्पर्धेसाठी आर. सी. पटेल हायस्कूल मधील शिक्षिका सीमा नलावडे व व सायली वैश्यफन्न यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
Source link
MajhiNews Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Maharashtra Breaking News | मराठी ताज्या बातम्या