14 महिन्यांपासून एकदम हेल्दी आहे महिला

हे उपचार घेतल्यानंतर महिला १४ महिन्यांपासून पूर्णपणे निरोगी असून तिच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीयेत. विशेष म्हणजे तिला आता अँटीरेट्रोव्हायरल थेरपीही दिली जात नाहीये. २०१३ मध्ये महिलेला एचआयव्ही झाल्याचे निदान झाले आणि तेव्हापासून तिला अँटीरेट्रोव्हायरल औषधे दिली जात होती. मार्च 2017 मध्ये तिला तीव्र मायलोजेनस ल्युकेमियाचे निदान झाले आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कॉर्ड ब्लड ट्रान्सप्लांट करण्यात आले.
(वाचा :- Foods Never Expire : किचनमधील हे 5 पदार्थ कधीच होत नाहीत एक्सपायर, अजिबात करू नका फेकून देण्याची चूक..!)
पेशींमध्ये एचआयव्हीला प्रवेश करण्यापासून रोखते गर्भनाळीचे रक्त

न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनमधील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. मार्शल ग्लासबी यांनी सांगितले की, महिला रुग्णाला एका डोनरकडून कॉर्ड म्हणजेच नाळीतील रक्त मिळाले होते, जे एचआयव्हीला पेशींमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करते किंवा रोखते. परंतु हे गर्भनाळीचे रक्त पेशींमध्ये योग्यरित्या मिक्स होण्यासाठी सुमारे सहा आठवडे लागू शकतात, म्हणूनच त्या महिलेला प्रथम श्रेणीच्या नातेवाईकाकडून अंशतः जुळलेल्या रक्त स्टेम पेशी देखील देण्यात आल्या आहेत.
(वाचा :- Blood thinner food : रक्त घट्ट झाल्यामुळे वाढतो ब्लड क्लॉट व हार्ट अटॅक सारख्या भयंकर आजारांचा धोका, रक्त पातळ करण्यासाठी खा ‘हे’ 5 स्वस्तातले पदार्थ..!)
दरवर्षी 50 रूग्णांचा होऊ शकतो उपचार

उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टरांपैकी एक डॉ. कोएन व्हॅन बसियन यांनी स्पष्ट केले की एचआयव्हीसाठी नाभी किंवा नाळे संबधीचा उपचार अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. ते म्हणाले की अमेरिकेत दरवर्षी सुमारे 50 रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो असा आमचा अंदाज आहे.
(वाचा :- Pregnancy Weight Loss : लिंबू पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून बनवलेलं पेय पिऊन या महिलेने घटवले 25 किलो वजन, करीना कपूर होती इंस्पिरेशन!)
बॉन मॅरोच्या तुलनेत खूप सोपा उपाय

या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बोन मॅरोपेक्षा हे स्क्रीन करणे खूप सोपे आहे. हॅप्लो-कॉर्डने रुग्णावर उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी आनुवंशिक विकृती शोधण्यासाठी हजारो कॉर्ड रक्ताचे नमुने आधीच तपासले होते.
(वाचा :- Diabetes diet tips : खाणं तर दूरच, ‘हे’ 6 पदार्थ चाटूनही बघू नका, नाहीतर होऊ शकतो मृत्यूला निमंत्रण देणारा डायबिटीज!)
या आधी 2 रूग्णांवर झालाय एड्सचा इलाज

2008 मध्ये, कॅलिफोर्नियातील टिमोथी रे ब्राउन, ज्यांना ‘बर्लिन पेशंट’ म्हणून ओळखले जायचे, ते एड्समधून बरे होणारे पहिले व्यक्ती होते. 2010 मध्ये त्यांची ओळख उघड झाली आणि 2020 मध्ये रक्ताच्या कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. दुसरा रुग्ण, अॅडम कॅस्टिलेजो, ‘लंडन पेशंट’ म्हणून ओळखला जाणारा, जो 2019 मध्ये एड्सने बरा झालेला दुसरा रुग्ण होता.
(वाचा :- Quick weight loss tips : संपूर्ण शरीरावरची चरबी जाईल झटक्यात जळून, करा ‘ही’ 6 अतिमहत्त्वाची कामे!)