Ashok Saraf: “…तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते”, राज ठाकरे यांच्याकडून तोंडभरून कौतूक!

Raj Thackeray On Ashok Saraf: पुण्यात (Pune) आयोजित करण्यात आलेल्या ‘अशोक पर्व’ कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी पुण्यातील सर्व रसिकांचे आभार मानले. मी ज्या चित्रपटांत (Marathi Movie) काम करतो, त्यातील भूमिका लोकांना मनापासून आवडल्या. लोकांना माझं काम आवडलं, हे बघून मी त्यांचा अतिशय ऋणी आहे, असं अशोक सराफ म्हणाले. त्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलं. (raj thackeray said ashok saraf would chief minister if he born in south india pune marathi news)

अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त (Happy Birthday Ashok Saraf) पुण्यात विशेष कार्यक्रम आयोजित (Pune News) करण्यात आला होता. कार्यक्रमाची सांगता करताना राज ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अशोक सराफ यांचं तोंडभरून कौतूक केलंय. अशोक सराफ आज दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री (CM) असते, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

अशोक सराफ यांचे 40-40 फूट उंचीचे कटआऊट लावले गेले असले. महाराष्ट्रात मात्र असं काही होत नाही. कलावंतांच्या बाबतीत विषय थोडक्यात संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणं सोपी आणि साधी गोष्ट नाही, असं म्हणत त्यांनी अशोकमामा यांचं गुणगाण गायलं.

हेही वाचा :  Success Story: बॅंकेची नोकरी सोडून छोट्याशा दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..

आणखी वाचा – Raj Thackeray: “राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, महाराष्ट्राला कंगाल केलं अन्…”

दरम्यान, परदेशात कलावंतांच्या नावानं विमानतळ असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावानं चौक असतात. त्यांच्याकडे कलावंतांची प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा आपल्याकडे जपली जात नाही, असं खंत देखील राज ठाकरे यांनी बोलून दाखवली. राज ठाकरेंसारखा ब्रिलियंट व्यक्ती माझा आवडता माणूस आहे, असं अशोक सराफ म्हणाले होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …