2023 Budget – खनिज व व्हिटॅमिनचं भांडार आहेत हे पदार्थ, रोज खाल्ले तर वयाच्या 60 नंतरही होणार नाहीत गंभीर आजार

बाजरी किंवा भरड धान्याला सुपरफूड्स असेही म्हणतात. त्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नुकतेच, 2023 च्या अर्थसंकल्पात, finance ministrer Nirmala sitaraman यांनी बाजरी खाद्यपदार्थांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी श्री अन्न योजना जाहीर केली आहे. याआधी, यंदाचे वर्ष बाजरीचे वर्ष म्हणून साजरे करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून मंगळवारी संसदेत बाजरीच्या अन्नापासून तयार केलेले विशेष जेवणही देण्यात आले होते. काय आहे श्री अन्न योजना?

जाड भरड असलेल्या धान्याला श्री अन्नाचा दर्जा देण्यात आला आहे. प्राचीन काळी ही धान्ये लोकांच्या आहाराचा मुख्य भाग होती. पण कालांतराने त्याची जागा गहू, तांदूळ अशा धान्यांनी घेतली. अशा स्थितीत जाड भरड असलेल्या धान्याच्या उत्पादनावरही परिणाम झाला. लोकांच्या ताटातले पोषक धान्य पुन्हा एकदा परत आणण्यासाठी सरकारने श्री अन्न योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये भरड धान्य उत्पादनाला चालना दिली जाईल. याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला प्रक्रिया न केलेल्या जाड भरड असलेल्या धान्यांचे आरोग्याशी संबंधित फायदे सांगणार आहोत. (फोटो सौजन्य :- iStock, @President of India Twitter, freepik.com)

असतात हे पोषक घटक

असतात हे पोषक घटक

जाड प्रक्रिया न केलेल्या धान्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, सावां, कांगणी, चणा, कोडो, कुटकी आणि कुट्टू यांचा समावेश होतो. यामध्ये प्रथिने, आहारातील फायबर, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त, पोटॅशियम, तांबे आणि सेलेनियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय, हे धान्य त्यांच्या अँटिऑक्सिडेंट, फ्लेव्होनॉइड्स, अँथोसायनिन्स, सॅपोनिन्स आणि लिग्नॅन्स गुणधर्मांसाठी देखील ओळखले जाते. म्हणूनच हे धान्य खूप जास्त पौष्टिक आणि आरोग्यदायी मानले जाते.

हेही वाचा :  फिस्टुलावर हे आयुर्वेदिक औषध अतिशय गुणकारी, योग्यपद्धतीने सेवन केल्यास सर्जरीचीही गरज भासणार नाही

(वाचा :- शास्त्रज्ञांचा शोध – हाडांचा भुगा होऊ नये म्हणून Vitamin D नाही ही 1 गोष्ट खाणं गरजेची, प्रत्येक घरी सहज मिळते)​

बाजरी खाल्ल्याने शुगर वाढते का?

बाजरी खाल्ल्याने शुगर वाढते का?

बाजरी हे मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी अन्न आहे. ग्लुटेन मुक्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असण्याव्यतिरिक्त, बाजरीमध्ये फायबर, प्रथिने, अमीनो ऍसिड, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे सारखी खनिजे भरपूर असतात. त्यामुळे त्याचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. फ्रंटियर्स इन न्युट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या 11 देशांमधील संशोधनात असे दिसून आले आहे की, मधुमेह असलेल्या लोकांच्या आहारात बाजरीचा समावेश केला पाहिजे, त्यामुळे डायट आणि जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी 12-15% ने कमी होते.

(वाचा :- आरोग्य मंत्र्याला गोळी झाडून ठार करणा-या पोलिसाला हा भयंकर आजार, हे रूग्ण छोट्याशा गोष्टीसाठी करतात थेट हत्या)​

वजन घटवण्यास फायदेशीर

वजन घटवण्यास फायदेशीर

एका स्टडीमध्ये दिसून आले आहे की, बाजरी लठ्ठ लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे बाजरी खाल्ल्याने शरीराला खूप जास्त फायदा मिळतो. तुम्ही जर वजन कमी करण्याचे उद्दिष्ट राखले असेल तर आपल्या आहारात आवर्जून बाजरीचा समावेश करा आणि बघा तुम्हालाच त्यातून खूप फायदा दिसेल.

हेही वाचा :  भाच्याच्या मोबाईलवर प्रियकराचा फोन आला अन्... नगरमध्ये पत्नीने काढला पतीचा काटा

(वाचा :- आतड्यातील विषारी घाण झटक्यात काढून फेकतात हे 5 पदार्थ, गॅस, अपचन, पोट साफ न होणं सर्व समस्यांचा उपाय किचनमध्ये)

बाजरी खाल्ल्याने होत नाहीत हृदयविकार

बाजरी खाल्ल्याने होत नाहीत हृदयविकार

बाजरीमध्ये बीटा-ग्लुकन्स, फ्लेव्होनॉइड्स, अँथोसायनिडिन्स, टॅनिन, लिग्नान आणि पोलिकोसॅनॉल यांसारखे अँटिऑक्सिडंट असतात. हे अँटिऑक्सिडंट्स एलडीएलसह एकूण कोलेस्टेरॉल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. म्हणूनच जाणकार आणि तज्ज्ञ एका निरोगी हृदयासाठी आहारात बाजरीचा समावेश करण्याचा सल्ला नक्की देतात.

(वाचा :- या 3 चुकांमुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी होतं विषारी, पिताच सर्व अवयवांत पसरतात अनेक रोग व होतात भयंकर वेदना)​

कॅन्सर रोखण्यासाठी बाजरी खा

कॅन्सर रोखण्यासाठी बाजरी खा

फॉक्सटेल आणि प्रोसो सारखे संपूर्ण धान्य कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतात. वास्तविक, त्यात फायटोकेमिकल्स असतात, जे कोलन, स्तन, यकृत यांमध्ये गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करतात. यामुळे कॅन्सर रोखण्यास मोठी मदत मिळते. जर तुमच्या आहारात बाजरीचा समावेश असेल तर शरीरात कॅन्सर निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते.

(वाचा :- या 5 गोष्टी ब्लॉक करतात रक्ताच्या नसा किंवा रक्तवाहिन्या, Heart Attack पासून वाचवतील कार्डियोलॉजिस्टचे हे उपाय)​

हेही वाचा :  आजी-आजोबांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याचा नवा ट्रेंड, आलिया-प्रियांकाने फॉलो केल्या या गोष्टी

पचन सुधारते

पचन सुधारते

भरड धान्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्थेचे कार्य सुधारण्याचे काम करते. बद्धकोष्ठता, पोट फुगणे, सूज येणे, पेटके येणे यासारख्या समस्याही याच्या नियमित सेवनाने दूर होतात. याशिवाय आतडे, यकृत, किडनी यासह एकूण आरोग्याला चालना मिळते. म्हणूनच मंडळी आवर्जून आहारात बाजरीचा समावेश करा. जर तुम्हाला बाजरी आवडत नसेल तर तुम्ही एक मोठा पौष्टिक घटक मिस करताय असेच म्हणावे लागेल.

(वाचा :- पोट, मांड्या, कंबरेची चरबी झटक्यात जाईल जळून, फॉलो करा एक्सपर्टने सांगितलेला 7 दिवसांचा Weight Loss Diet Plan)

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलिसही थक्क, तब्बल 2 कोटींचे…

Sandalwood Smuggling: भारताचे ‘लाल सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदनाची खुलेआम तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा …

महाराष्ट्रात पुन्हा ‘सैराट’! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या

Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या …