जय श्रीराम! योगी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा, कंगनाचे मतदारांना आवाहन

Kangana Ranaut on UP Elections : उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या (20 फेब्रुवारी) पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौतच्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे. कंगनाने या निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. योगी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भाजपला मतदान करा, असे आवाहन केलेले व्हिडीओ कंगना रनौतने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

नेमकं कंगना रनौतने काय म्हटलंय 

आपल्या सर्वांना माहित आहे की उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका सुरू आहेत. या निवडणूक कुरुक्षेत्रात आमचे एकमेव हत्यार मतदान आहे. लक्षात ठेवा आम्हाला आमच्या आवडत्या योगी सरकारला परत आणायचे आहे. त्यामुळे सर्वांनी  मतदान करा. मतादानाला जाताना आपल्यासोबत तीन ते चार जणांना सोबत घेऊन जा. लक्षात ठेवा विजयाचा हा विक्रम मोडता कामा नये, एकही मत चुकता कामा नये, जय श्री राम, असा व्हिडीओ कंगनाने शेअर करत भाजपला मतदान देण्याचे आवाहन केले आहे.

 


दरम्यान, कंगनाच्या या व्हिडिओला अनेकजण पसंती देत ​​आहेत. आतापर्यंत इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर सुमारे 9.5 हजार लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी कमेंट करून फक्त भाजपच सत्तेत परत येईल असे म्हटले आहे. तर अनेकांनी यावेळी सपा भाजपला हरवेल असे सांगितले.

हेही वाचा :  सोनिया गांधींची समाजमाध्यमांवर जाहीर नाराजी, आता राहुल गांधींनी पुरावेच दिले, फेसबुकवर केली सडकून टीका

उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी मतदन होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 2 कोटी 15 लाख 75 हजार 430 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 16 लाख 12 हजार 010 पुरुष मतादर तर 99 लाख 62 हजार 324 महिला मतदारांचा समावेश आहे. 59 जागांसाठी तब्बल र्व पक्षांचे मिळून 627 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये 531 पुरुष उमेदवार तर 96 महिला उमेदवारांचा समावेश आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्ता राखण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. तर भाजपकडून सत्ता खेचण्यासाठी समाजवादी पार्टीने यंदा जोरदार तयारी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …