Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या लेकीचा VIDEO व्हायरल, आजारी असतानाही मुंडे मुलीला म्हणतात…

Dhananjay Munde Daughter Video: आज संपूर्ण भारतात 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आयोजित केले गेले. प्रजासत्ताकच्या दिनादिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. त्यात त्यांची लेक आदीश्री (Dhananjay Munde Daughter) देखील दिसत आहे. (Dhananjay munde video on explaining importance of republic day to daughter Adishree marathi news)

धनंजय मुंडे यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर (Dhananjay Munde Video) अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओत धनंजय मुंडे आपल्या लेकीला प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व समजावून सांगताना दिसत आहेत. यात बाप-लेकीचं प्रेम पाहून कार्यकर्त्यांचं मन भरून आलंय. त्यामुळे अनेकांच्या स्टेटसवर हा व्हिडिओ शेअर होताना दिसतोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना नोव्हेंबर महिन्यात तयार केली होती. त्यानंतर भारत सरकारने ती 26 जानेवारीला स्वीकारली. त्यानंतर 26 जानेवारीपासून देशात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळेच आपण 26 जानेवारी या दिवसाला प्रजासत्ताक दिन साजरा करतो, असं धनंजय मुंडे आदीश्रीला (Dhananjay Munde Daughter Adishree) समजावून सांगत आहेत.

हेही वाचा :  १८० प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ; पुढील आठवडय़ात स्थायी समितीची शेवटची बैठक

पाहा Video – 

ट्विटमध्ये काय म्हणाले मुंडे?

अपघातामुळे सध्या घरी विश्रांती घेत असताना माझी मुलगी आदीश्रीसोबत गप्पा मारायला वेळ मिळतोय. प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या तिच्या प्रश्नाचं समाधान केलं. राजकीय व सामाजिक कार्याच्या गडबडीतील आयुष्यात असे क्षण आनंद देऊन जातात, असं धनंजय मुंडे ट्विट (Dhananjay Munde Tweet) करत म्हणतात.

आणखी वाचा – Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांचा अपघात (dhananjay munde accident) झाला होता. मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12 : 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या छातीला मार लागला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय. त्यानंतर ते सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचं पहायला मिळतंय.

हेही वाचा :  सेक्स करताना झाला मृत्यू, अन् मग महिलेने जे केले ते वाचून तुम्हाला धक्का बसेल



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …