Babar Azam चा डबल धमाका,’मेन्स ODI प्लेयर ऑफ द इयर’सोबतच ‘क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कारही खिशात

Babar Azam ICC Awards : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसी (ICC) यंदाचे आयसीसी पुरस्कार जाहीर करत असून पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) याला यंदा दुहेरी आनंद मिळाला आहे. बाबर आझमने आयसीसी पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटूचा (ICC Mens ODI Cricketer of the year) खिताब नुकताच पटकावला असून आता त्याला सर गॅरी सोबर्स (Sir garfield Sobers) आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द ईयर (ICC mens Cricketer of the year) म्हणूनही गौरवण्यात आलं आहे. अशा प्रकारे बाबर आझम याला दोन मोठ्या पुरस्कारांनी यंदाच्या वर्षी सन्मानित करण्यात आलं आहे. आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.


हे सलग दुसरे वर्ष आहे जेव्हा पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमची आयसीसी पुरुष एकदिवसीय प्रकारात वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली आहे. आयसीसी पुरूष एकदिवसीय क्रिकेटपटूच्या शर्यतीत बाबर आझमने वेस्ट इंडिजच्या शाय होप, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा आणि ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा यांना मागे टाकलं आहे. बाबर आझमने गेल्या वर्षी केवळ नऊ एकदिवसीय सामने खेळले असले तरी  त्याने या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजीचं प्रदर्शन दाखवलं. बाबर आझमने गेल्या वर्षी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 शतकं झळकावली, तर 5 वेळा 50 धावांचा टप्पा पार केला.

हेही वाचा :  ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त!

बाबर आझमची वनडेतील कामगिरी

बाबर आझमने (Babar Azam ODI) 2022 या वर्षभरात 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये (ODI Matches in 2022) 84.87 च्या सरासरीने 679 धावा केल्या होत्या. याशिवाय, बाबर आझमने ज्या नऊ सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते, त्यामध्ये केवळ एका सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्याचबरोबर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सची (Ben Stokes) आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर (ICC Test Cricketer Of the Year) म्हणून निवड झाली आहे.  बेन स्टोक्स याने मागील वर्षी कसोटी फॉर्मेटमध्ये (Test Cricket) 36.25 च्या सरासरीने 870 धावा केल्या होत्या. तर बेन स्टोक्सने गोलंदाजीत 26 विकेट घेतल्या.

हे देखील वाचा-Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …