Congress : सभा सुरु होती, त्याचवेळी मंडपात वळू घुसल्याने उडाली तारांबळ

Congress Sabha : बातमी गुजरातमधून.निवडणुकीची रणधुमाळी (Gujarat Election) शिगेला पोहोचली आहे. गुजरातमध्ये कोण येणार याचीच चर्चा जास्त असताना एका वळूची जोरदार चर्चा सुरु झालेय. (Political) त्याचे असं झालं की, मेहसाणामधील काँग्रेसच्या सभेत वळू घुसल्यानं खळबळ उडाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सभेत वळू घुसल्याने तो चर्चेचा विषय झाला. (Political News in Marathi)

मेहसाणाच्या रेवा गावात सुरु होती अशोक गेहलोत यांची प्रचार सभा सुरु होती. गेहलोत यांचं भाषण सुरु असतानाच एक वळू सभास्थळाचा मंडप तोडून थेट लोकांमध्ये शिरला आणि तिथे एकच गोंधळ निर्माण झाला. काँग्रेसच्या सभास्थळी मल्लिकार्जुन खरगे, अशोक गेहलोत, जगदीश ठाकूर उपस्थित होते. मात्र, काहीवेळ गोंधळ उडाल्याने सभाचा नूरच पालटून गेला. मात्र, त्यानंतर या घुसलेल्या वळूनला बाहेर हुसकावून लावण्यात आले. यावेळी उपस्थितांतमध्ये खबराट उडाली होती. (अधिक वाचा – Supreme Court Slams Centre : केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले)

गुजरात विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. गेल्या 27 वर्षांपासून येथे भाजपची सत्ता आहे. मात्र, या सत्तेला काँग्रेस तसेच आप हादरा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपकडूनही जोरदार प्रचार करण्यात येत आहे. असे असले तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक मोफत देण्याच्या घोषणा केल्या आहेत. शाळा, आरोग्य सुविधांवर आमचा भर असेल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता या राज्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

हेही वाचा :  "पुरंदरे यांचे लिखाण विकृत"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम

‘काँग्रेसला मजबूत केले पाहिजे’

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशोक गेहलोत यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पायलट यांना देशद्रोही म्हटले होते. गेहलोत यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, अशाप्रकारे चिखलफेक करण्यापेक्षा सर्वांनी मिळून काँग्रेसला मजबूत केले पाहिजे. पलटवारांच्या दरम्यान काँग्रेसचे दोन्ही दिग्गज नेते एकत्र दिसले.

निमित्त होते राजस्थानची राजधानी जयपूर येथील पत्रकार परिषदेचे. येथे दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेची तयारी करण्यात आली. यावेळी अशोक गेहलोत म्हणाले, राहुल जी ज्या रुपात प्रवासाला निघाले आहेत, त्यामुळे संपूर्ण देशात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत ही यात्रा संपेल, पण देशात निर्माण झालेले आव्हान, तणाव आणि हिंसाचाराचे वातावरण याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल यांनी मांडलेला मुद्दा संपूर्ण देशाने स्वीकारला आहे. 

ते म्हणाले, पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजरातमध्ये ज्या प्रकारे फिरत आहेत, तिथे यात्रा का होत आहेत? राहुल गांधींच्या भेटीचा संदेश मोठा असल्याने ते इतके घाबरलेले आणि अस्वस्थ का आहेत, हे तुम्ही समजू शकता. त्याचवेळी सचिन पायलट म्हणाले, राहुल गांधींची राजस्थानमध्ये होणारी भारत जोडो यात्रा खूप संस्मरणीय असेल, ही एक ऐतिहासिक यात्रा असेल, या यात्रेत सर्व स्तरातील लोक सामील होतील. या यात्रेत कार्यकर्ते आणि नेतेही सामील होणार आहेत. 

हेही वाचा :  no corruption found in sugar mills sale says ajit pawar zws 70 |‘साखर कारखाने विक्री व्यवहारात घोटाळा नाही’



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?

Sam Pitroda Resigns : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा …

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …