आमिर खान, सामंथा, मानसी नाईक मोठमोठ्या कलाकारांचे लग्न ठरले फेल, यातून धडा घेऊन या 5 चुकांकडे करू नका दुर्लक्ष

परफेक्ट रिलेशनशिप एका रात्रीत घडत नाही असं कुणीतरी बरोबरच म्हटलंय. जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दीर्घ आणि आयुष्यभराचे नाते हवे असते, तेव्हा तुम्हाला थोडा संयम आणि खूप प्रेम दाखवावे लागते. जेव्हा दोन लोक एकमेकांना डेट करण्याबरोबरच पहिल्यांदा भेटतात तेव्हा ते तासन् तास फोनवर बोलू लागतात. पण इथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे नवीन नातं सुरू करण्यासाठी खरंच हे पुरेसे आहे का? भलेही आपण आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करत असून पण अशावेळी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही ज्या तुमच्या पुढील आयुष्यात संकटे निर्माण करू शकतात. तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत राहिल्याने तुमचे जीवन पूर्वीपेक्षा चांगले आणि आनंदी होऊ शकते यात शंकाच नाही.

परंतु नवीन नातेसंबंध सुरू करण्यापूर्वी काही योग्य निर्णय घेणे आणि समज असणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही नुकतेच नवीन रिलेशनशिपमध्ये आले असाल आणि नाते अधिक घट्ट कसे बनवावे याची उत्तरे शोधत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण या गोष्टी समजून घेतल्याशिवाय पुढे जात असाल तर नात्यात टोकाचे मतभेद होणं ते घटस्फोट घेऊन विभक्त होणं हा त्रास सहन करावा लागू शकतो. सध्या घटस्फोटाचे प्रमाण खूप वाढले आहे ज्यात अनेक मोठमोठ्या कलाकारांचीही नावे आहेत. म्हणून नातं सुरू करण्याआधीच या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. (फोटो सौजन्य :- Instagram @samantharuthprabhuoffl, @manasinaik0302, @chayakkineni)

हेही वाचा :  माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरिकेत गेली आणि आयुष्यात आलं एक विचित्र वळण, घ्यावा लागला भारतात परतण्याचा निर्णय..!

स्वत:ला डिटॉक्स करा

स्वत:ला डिटॉक्स करा

कोणतेही नवीन नाते सुरु करण्यापूर्वी जुनी नाती विसरणे खूप गरजेचे असते. त्यामुळे तुमची पहिली पायरी म्हणजे स्वतःला डिटॉक्स करणे. शेवटच्या नात्यात काय झाले? तुमचे काय चुकले? सगळं विसरून नव्या नात्याकडे वाटचाल करा. तुम्ही भूतकाळात अडकून राहिल्यास, तुम्ही नैसर्गिकरित्या कधीही मजबूत नवीन नातेसंबंध तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणार नाही. तुमच्या जोडीदारावरही याचा परिणाम होईल.

(वाचा :- फेसबुकवर मैत्री अन् त्याने केलं थेट प्रपोजच, मी नाही म्हटलं..पण पुढे जे घडलं ते स्वप्नातही विचार न करण्यासारखं)​

मित्रांमध्ये मिक्स व्हा

मित्रांमध्ये मिक्स व्हा

मित्र हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कारण तुमच्या मित्रांना तुमच्याबद्दल सर्व काही माहीत आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मित्रांना भेटा आणि त्यांची तुमच्या मित्र मंडळींशी ओळख करून द्या. अनेक अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की समान मित्र असण्याने जोडप्यांना त्यांचे नाते मजबूत करण्यास मदत होते.
(वाचा :- या 5 प्रकारच्या मुलांवर अक्षरश: वेड्यासारखं प्रेम करते बायको,नवरा म्हणेल तिच त्यांच्यासाठी पूर्व व पश्चिम दिशा)​

हेही वाचा :  या २ गोष्टी तुमचा संसार सुखाचा करतील, sudha murthy यांनी दिला गुरुमंत्र

जास्त अपेक्षा ठेवू नका

जास्त अपेक्षा ठेवू नका

प्रत्येकाच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. तुमच्या बाबतीतही असेच होत असेल तर त्यात गैर काहीच नाही. परंतु चुकीच्या अपेक्षा तुमच्या नात्याच्या सुरुवातीला अडथळे निर्माण करू शकतात. तुमचं नातं मजबूत आणि दीर्घकाळ टिकावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराकडून अनावश्यक अपेक्षा ठेवू नका.
(वाचा :- नणंदेवर प्रेम जडलं म्हणून जगाला दाखवण्यापुरतं केलं नव-याशी लग्न, पण पुढे जे झालं ते अक्षरश: हादरवून सोडणारं..!)​

एक्सला विसरून जा

एक्सला विसरून जा

आपल्या एक्सचा सतत विचार करणे व तिला विसरून न जाणे तुमचे रिलेशनशिप खराब करू शकते. तुम्ही तुमच्या सध्याच्या जोडीदारासोबत असताना तुमच्या एक्सच्या आठवणीत वा संपर्कात राहिल्यास, तुम्ही स्वत:च तुमचे नाते संपवत असता. तुम्ही स्वत:च स्वत:च्या हाताने पायावर कुऱ्हाड मारता. तुमची लव्ह लाईफ चांगली जावी असे तुम्हाला वाटत असेल, तर शक्य तुमच्या एक्स पासून शक्य तितके दूर राहा. याशिवाय, तुमच्या एक्सची तुमच्या जोडीदाराशी तुलना करू नका.

(वाचा :- माझ्या गुरूने घरात गुप्तपणे एक स्त्री लपवून ठेवली होती,ज्यामागील भयंकर सत्य समोर आलं अन् पायाखालची जमीनच सरकली)​

हेही वाचा :  Maharashtra Weather Forcast : सावध व्हा, सुट्टीला घरातच राहा; राज्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार

आहे तसा स्वीकार करा

आहे तसा स्वीकार करा

रिलेशनशिप टिकवण्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जोडीदार जसा आहे तसा त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. अजिबात त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. दोन व्यक्तींच्या नात्यात परस्पर समंजसपणा खूप महत्त्वाचा असतो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमच्या जोडीदाराला बदलायला लावणे ठीक नाही. ते जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारा आणि तेव्हाच तुमचे नाते अधिक खुलू शकते.
(वाचा :- हनीमूनच्याच दिवशी होईल नात्याचा कायमचा THE END, तुमच्या या 5 सवयी देतात आधीच धोक्याचा इशारा, वेळीच व्हा सावध.!)​

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …