बर्गर-पिझ्झा खाऊन वेटलॉस करणा-या विकी कौशलवर तुम्हीही जळाल, सिक्रेट वेटलॉस फंडा उघड

प्रत्येक व्यक्तीला स्लिम आणि फिट दिसण्याची इच्छा असते आणि करोनासारखे घातक आजार पाहिल्यावर हेल्दी राहणे सध्याच्या काळात आवश्यक झाले आहे हे देखील तितकेच खरे आहे. पण जिभेच्या चोचल्यांवर नियंत्रण ठेवणं हा काय भातुकलीच्या खेळाएवढं सोपं नक्कीच नाही. त्यामुळे हल्ली प्रत्येक वयातील माणसाचे वजन आणि शरीरावरची चरबी अचानक वाढू लागते आणि फिटनेस कोसो दूर जातो. आता अशा परिस्थितीत अशा लोकांना पाहून खूप हेवा वाटू लागतो, जे खूप जंक फूड खाल्ल्यानंतरही सडपातळच राहतात.

दुसरीकडे, काही लोक कडक डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी करू शकत नाहीत. अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal fitness and weight loss secrets) देखील अशा भाग्यवान लोकांपैकी एक आहे, जे भरपूर बर्गर आणि पिझ्झा खाल्ल्यानंतरही सहज वजन कमी करतात. TOI च्या मते, विकीने अमिताभ बच्चन यांना त्याच्या या ‘सुंदर समस्या’ बद्दल एका क्विझ शोमध्ये सांगितले. चला तर मग जाणून घेऊया अभिनेता विकी कौशल जंक फूड खाऊनही वजन कमी कसे करतो?

कोणतीही जादू नाही तर हे विज्ञान आहे

विकी कौशलच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीमागे कोणतीही जादू नाही तर विज्ञान आहे. Masaan आणि URI सारखे उत्तम चित्रपट देणारा विकी वजन कमी करण्यासाठी इतरांप्रमाणे व्यायामाचीच मदत घेतो. मात्र, त्याला आहाराकडे फारसे लक्ष देण्याची गरज भासत नाही. कारण, तो एक एक्टोमोर्फ (Ectomorphs) आहे.

हेही वाचा :  श्रीलंकेचा क्रिकेटर मुरलीधरनने मुलीचं नाव ठेवलं अतिशय दिव्य, मुलीच्या नावासाठी ठरेल प्रेरणादायी

(वाचा :- वेटलॉस, पोट साफ न होणं, डायबिटीज, बॉडी डिटॉक्स, डायजेशनच्या समस्या होतील दूर, खा हा 1 पदार्थ)

विक्कीला Weight Gain मध्ये येते समस्या

-weight-gain-

TOI नुसार, विकीने अमिताभ बच्चन यांना क्विझ शोमध्ये सांगितले की, त्याला वजन वाढवताना खूप त्रास होतो आणि त्यासाठी त्याला ग्रील्ड फूडसारखं कंटाळवाणं डाएट फॉलो करावं लागतो. हे एक्टोमॉर्फचं आणखी एक चिन्ह आहे.

(वाचा :- Ayurveda Weight Loss : आयुर्वेद डॉ दावा – फक्त तीन आठवड्यांत जळून जाईल शरीरातील सर्व चरबी, फॉलो करा या 5 टिप्स)

एक्टोमोर्फ म्हणजे काय?

University of Houston च्या मते, एक्टोमॉर्फ हा शरीराचा आनुवंशिक प्रकार आहे, जो सांगाडा आणि शारीरिक संरचनेवर आधारित असतो. एक्टोमॉर्फ्स बॉडी टाईप असलेले लोक सहसा उंच असतात आणि त्यांच्या शरीरात चरबी आणि स्नायू फारच कमी असतात. ते सडपातळ कंबर, कमी रुंद हिप्स आणि खांदे, लहान सांधे आणि लांब हातपाय यांद्वारे असा लोकांना ओळखले जाऊ शकते.

(वाचा :- Weight Loss : अँटी-ऑबेसिटी गुणधर्मांनी ठासून भरलेत हे 5 कुकिंग ऑइल्स, जाळून टाकतात पोट, मांड्या व कंबरेची चरबी)

हेही वाचा :  अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!

महिला असतात जास्त भाग्यवान

एक्टोमॉर्फ आणि इतर प्रकारचं शरीर असणा-या लोकांवर एक संशोधन केले गेले, जे NCBI वर प्रकाशित झाले आहे. या संशोधनात असे दिसून आले की पुरुषांपेक्षा एक्टोमॉर्फमध्ये महिलांची संख्या जास्त असते. हेच कारण आहे की तुम्हाला बहुतांश वेळा स्त्रिया या पुरुषांपेक्षा सडपातळ व स्लिम-ट्रीम दिसून येतात.

(वाचा :- Vitamin K Rich Foods : शरीराचा एक एक अवयव निकामी करते Vitamin K ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 6 पदार्थ नाहीतर)

एक्टोमॉर्फ लोक असतात एकदम फिट

जरी एक्टोमॉर्फ लोक बारीक असले तरीही त्यांना पूर्णपणे तंदुरुस्त म्हणता येत नाही. कारण, त्यांना शरीरातील स्नायूंवरील मांसचे प्रमाण (Muscle mass), ऊर्जा आणि ताकद कमी होण्याचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही किती व किती कमी एक्टोमॉर्फ आहात यावरही ते अवलंबून असते.

(वाचा :- स्टडीमध्ये खुलासा; घोरणा-या लोकांना आहे Cancer चा सर्वात जास्त धोका, या 5 घरगुती उपायांनी वेळीच कमी करा जोखिम)

अशा लोकांसाठी बेस्ट एक्सरसाइज

TOI नुसार, अशा लोकांनी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी रेजिस्टेंस ट्रेनिंगवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्यामुळे स्नायू आणि ताकद वाढण्यास मदत होते. या ट्रेनिंगमध्ये स्क्वॉट्स, डेडलिफ्ट, शोल्डर प्रेस, बेंच प्रेस असे व्यायाम येतात.

हेही वाचा :  Mumbai Metro : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त 45 मिनिटांत, मेट्रो 12 मिळणार गती

(वाचा :- मॅच दरम्यान स्टार फुटबॉलरचं हृदय पडलं अचानक बंद, या भयंकर आजाराचं दिसत नाही एकही लक्षण, 6 गोष्टींपासून रहा दूर)

एंडोमोर्फ आणि मेसोमार्फ म्हणजे काय?

एक्टोमॉर्फ व्यतिरिक्त, एंडोमॉर्फ आणि मेसोमॉर्फ हे शरीराचे दोन मुख्य प्रकार आहेत. ज्या लोकांच्या शरीरात जास्त कष्ट न करताही जास्त प्रमाणात चरबी, स्नायू आणि वजन तयार होते अशा लोकांना एंडोमॉर्फ (What is endomorph) म्हणतात. याउलट, ज्या लोकांचे शरीर कठोर परिश्रम न करता धष्टपुष्ट, कठोर आणि मजबूत असते त्यांना मेसोमॉर्फ्स (What is mesomorph) म्हणतात. या लोकांचे वजन ना जास्त असते ना कमी.

(वाचा :- कॅन्सर, पोट साफ न होणं, बद्धकोष्ठता, मुळव्याधाने तडपवून मारतो सकाळ-सायंकाळ घेतला जाणारा हा पदार्थ, आजच बंद करा)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …