Leopard Terror: बिबट्याची मोठी दहशत; 3 मुलांचा बळी घेत बनला नरभक्षक !, बोलवावा लागला ‘शूटर’

Man Eater Leopard: बिबट्या नरभक्षक झाल्याने 12 गावांतील ग्रामस्थ दहशतीच्या छायेखाली आहेत. (Leopard Attack) वनविभागाला या बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, या बिबट्याने प्राणी आणि मानवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तीन मुलांचा बळी गेला आहे. (Leopard attacks a child) त्यामुळे बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. गढवा जिल्ह्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रातील रांका, रामकांडा, भंडारिया आणि चिनिया या जंगलात महिनाभरापासून प्राणी आणि लहान मुलांना त्याने टार्गेट केलेय.

या नरभक्षक बिबट्याला थेट बंदुकीने मारु नये असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचवेळी स्टन गनद्वारे बेशुद्ध करुन त्याला पकडण्यात यावे, असे प्रशासनाने ऑर्डर काढली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) वन्यजीव शशिकर सामंता यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी ‘शूटर’ बोलवावे लागले आहेत. हे काम हैदराबादचे प्रसिद्ध प्राणी नेमबाज नवाब शपथ अली खान आणि त्यांच्या तज्ज्ञांच्या टीमद्वारे केले जाणार आहे. ही टीम गढवा येथे पोहोचत आहेत.  बिबट्या बेशुद्ध केल्यावर त्याला पकडले जाईल.

हेही वाचा :  काँग्रेसला 2.5 कोटींचा फटका! व्याजासकट वसूल केलं जाणार 39 वर्षांपूर्वीचं 'ते' बिल

50 ट्रॅपिंग कॅमेरा 12 गावांतील जंगलात बसवले

बिबट्याच्या ठिकाणासाठी वनविभागाने भंडारियाच्या बिंदा येथील बिबट्याची माहिती मिळाल्यानंतर आणि आदेश प्राप्त झाल्यानंतर रामकांडा आणि भंडारिया या सहा गावांतील जंगलात बसविण्यात आलेल्या  50 ट्रॅपिंग कॅमेऱ्यांचे कव्हर क्षेत्र वाढवले ​​आहे. रामकंडाच्या कुश्वर, बालीगड, बिराजपूर, सिंजो आणि बैरिया या वनक्षेत्रात एक चौरस किलोमीटरच्या परिसरात बसवण्यात आलेले हे कॅमेरे आता पीटीआर, रोडो, मांजरी, याला लागून तीन चौरस किलोमीटर अंतरावर बसवण्यात आले आहेत. बिजका, जॉनीखंड, तेवली, पारो, नागनाहा, बिंदा, अरार, मर्दा, रामर, पारसवार या जंगलातही कॅमेरे लावण्यात आलेत.

बिबट्या पकडण्यासाठी तीव्र मोहीम 

या बिबट्याने भंडारिया, रांका, चिनिया आणि रामकांडा येथे गेल्या 20 दिवसांपासून दहशत निर्माण केली आहे. नरभक्षक बिबट्याला रासायनिक पद्धतीने बेशुद्ध करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी हैदराबादचे नेमबाज नवाब शाफत अली खान, त्यांचा मुलगा असगर अली खान आणि त्यांच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. बिरसा बायोलॉजिकल पार्क, रांचीचे पशुवैद्य डॉ. ओम प्रकाश साहू हे देखील त्यांच्या टीमसोबत असतील. नवाब शाफत अली खान यांच्या टीमचे सदस्य हैदराबादहून पाटण्याला बोलविण्यात आले आहे.  

हेही वाचा :  Petrol Diesel Price : आज भटकंतीचा मूड? वाहनांचा Tank Full करण्याआधी पाहा पेट्रोल- डिझेलचे दर

बिबट्या हल्यातील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत

डीएफओ शशी कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत सुपूर्द केली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत विक्रम तुरी यांचे वडील ब्रह्मदेव तुरी, रोडो गावचे रहिवासी आणि रंका पोलीस स्टेशनच्या सेवाडीह गावातील रहिवासी मृत सीता कुमारीचे वडील जगदेव सिंह यांचा समावेश आहे. 14 डिसेंबरच्या संध्याकाळी रोडो गावात बिबट्याने सहा वर्षीय विक्रम तुरीवर हल्ला केला होता. यात त्याचा मृ्त्यू झाला. रामकांडा येथील कुशवार गावात बाली घासी यांचा 12 वर्षांचा मुलगा हरेंद्र घासी याची हत्या झाली. डीएफओ यांनी मयत रोडो गावातील सहा वर्षीय विक्रम तुरीच्या वडिलांना चार लाख रुपयांचा धनादेश दिला.

19 डिसेंबर रोजी सायंकाळी रांका पोलीस ठाण्याच्या सेवाडीह गावात सीता कुमारी या सात वर्षांच्या चिमुरडीचा बिबट्याने बळी घेतला होता. त्यांच्या कुटुंबीयांना 3.55 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. उर्वरित 45 हजार रुपये आठवडाभरात देण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, रामकांडाच्या कुशवारमध्ये, कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे हरेंद्रच्या कुटुंबीयांना मदत देता आलेली नाही, अशी माहिती देण्यात आली.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?

Beed Loksabha Constituency Special Report : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन …

ठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?

Loksabha 2024 : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये निवडणूक साहित्य, EVM आणि हजारो मतदानकार्ड आढळून आल्याने …