अभिमानास्पद! …अन् 14000 फुटांवरुन मराहाष्ट्राच्या हिमांशु साबळेनं G20 झेंड्यासहीत मारली उडी!

Skydive In Russia With G20 Flag: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील हिमांशु साबळे सध्या दिल्लीत होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरत आहे. साहसी मोहिमांमध्ये सहभागी होऊन अटकेपार झेंडा फडकविणार साहसी व्यक्ती अशी हिमांशुची ओळख आहे. त्याने जी-20 निमित्त अशीच एक खास कामगिरी केली आहे.

नेमकं केलं काय?

नवी दिल्लीमध्ये आज म्हणजेच 9 सप्टेंबर आणि उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 दरम्यान G20 शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताला पहिल्यांदाच या परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. या परिषदेनिमित्त भारत सध्या जगभरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या परिषदेकडे आहे. याच महत्त्वपूर्ण प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी आणि राष्ट्राचा अभिमान आणि सन्मान करण्यासाठी भारताच्या हिमांशुने भन्नाट विक्रम केलाय. स्कायडायव्हर्सच्या एका टीमचा भाग असलेल्या हिमांशुने सहकाऱ्यांबरोबरच 14 हजार फूट उंचीवरुन उडी घेतली. रशियामधील ढगांच्या वर G20 चं चिन्हं असलेला ध्वज हिमांशुने आपल्या या भन्नाट उडीदरम्यान झळकावला. ही मोहीम प्रतीकात्मक आणि विस्मयणीय ठरली. या मोहिमेच्या माध्यमातून त्याने प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. जागतिक सहकार्य आणि मुत्सद्देगिरीसंदर्भात भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व या माध्यमातून करण्यात आलं.

हेही वाचा :  'तुमच्या अंगातून वास येतोय, खाली उतरा'; वैमानिकाने जोडप्याला चिमुकल्या मुलीसह विमानाबाहेर काढलं

नक्की पाहा हा व्हिडीओ >> भारतात G20 साठी आलेल्या ‘या’ नेत्याने विमानातून उतरतानाच एक डोळा झाकला कारण…

भारताच्या नावाने नवीन उंची गाठण्याचे धाडस करणाऱ्या हिमांशुवर सध्या सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिमांशुने दाखवलेल्या अविश्वसनीय धैर्य आणि कौशल्य देखील कौतुकास्पद असल्याचं सांगितलं जात आहे. या मोहिमेमध्ये भारतीय हवाई दलातील काही जवानही सहभागी झाले होते. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

अनेकांचा सहभाग

नवी दिल्लीमधील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये जी-20 च्या बैठकीसाठी जवळपास 40 देशांचे प्रतिनिधी आले आहेत. जी-20 बरोबरच अन्य देशांचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी या परिषदेसाठी भारतात आले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, जपान, बांगलादेश, इजिप्त, जर्मनी, फ्रान्सचे प्रमुख नेतेही सहभागी झाले आहेत.

नक्की पाहा >> विमानातील तो खास क्षण, ‘जय सिया राम’ म्हणत स्वागत अन्… ऋषी सुनक, अक्षता मुर्तींचे भारतातील Photos Viral

विशेष व्यवस्था

आज पहिल्या दिवशी सर्व नेत्यांचे स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बैठकीच्या ठिकाणी करणार आहेत. त्यानंतर रात्री विशेष भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीमधील 23 पंचतारांकित हॉटेल्समध्ये या नेत्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. नवी दिल्लीमध्ये या परिषदेच्यानिमित्ताने 1 लाखांहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. नवी दिल्लीवर 5 हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरांनी लक्ष ठेवलं जात आहे. पुढील 2 दिवसांसाठी दिल्लीतील वाहतुकीच्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर आपली प्रतिमा अधिक ठळपणे उमटवण्यासाठी या परिषदेचा भारताला फायदा होणार आहे.

हेही वाचा :  F1 Race : फॉर्मुला 1 ही रशियाविरुद्ध आक्रमक, यंदाची रशियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा रद्द



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …