ऋजुता दिवेकर यांनी सांगितले शेंगदाण्याचे त्वचेसाठी होणारे फायदे

बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या हातात गुळपाणी शेंगदाणे देण्याची भारतीय परंपरेमध्ये एक प्रथा आहे. शेंगदाणे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. हिंदीमध्ये त्याला कच्चा बदाम देखील म्हटलं जातं. शेंगदाण्यांचा अनेक पदार्थांमध्ये उपयोग केला जातो. काही लोक नाश्त्यासाठी पीनट बटर वापरतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केला जातो. शेंगदाण्यांचा तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. यासाठी करीना कपूरची डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने त्यांच्या सोशल मीडियावर खास पोस्ट लिहली आहे. त्याचप्रमाणे आपण शेंगदाण्याचे काही फायदे जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य :- Istock)

वृद्धत्व विरोधी काम

वृद्धत्व विरोधी काम

शेंगदाणे खाल्ल्याने वृद्धत्व विरोधी फायदे मिळतात. त्वचेवर शेंगदाण्याचे तेल लावल्याने सुरकुत्या आणि वयाशी संबंधित बदल त्वचेवर उशिरा दिसतात. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. यासाठी शेंगदाण्याच्या तेलात मिसळलेल्या लिंबाचा रस चेहऱ्यावर लावावा आणि 10 मिनिटांनी चेहरा धुवावा.

(वाचा :- Uric Acid: त्वचेवरील लाल डागांनी हैराण झाला आहात? ताबडतोब युरिक अ‍ॅसिडची चाचणी करा, ही आहेत लक्षणे) ​

हेही वाचा :  डायबिटीसपासून PCOD पर्यंत नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरते बाजरीची भाकरी, जाणून घ्या फायदे

शेंगदाण्याचे त्वचेसाठी फायदे

स्वच्छ आणि चमकणारी त्वचा

स्वच्छ आणि चमकणारी त्वचा

शेंगदाणे त्वचा स्वच्छ आणि त्वचेला पोषण देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे तेल त्वचेतील मृत पेशी काढून टाकते. ते थेट चेहऱ्यावर लावता येते. यासाठी तेलात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.

(वाचा :- ऐकाल तर नवल ! मुलीने क्रिमऐवजी चेहऱ्याला लावली मेहंदी, पुढे जे झालं ते बघून गडबडून जाल)

केसांसाठी फायदेशीर

केसांसाठी फायदेशीर

शेंगदाण्यात बायोटिनचे प्रमाण आढळते. हे केसांच्या वाढीसाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहे. शेंगदाण्याचे तेल कोंडा दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. यासाठी शेंगदाण्याच्या तेलात थोडे पाणी घालून केस धुण्यापूर्वी आठवड्यात तीन वेळा केसांना लावा. पण रात्रभर तेल लावून ठेवू नये.

(वाचा :- Benefits of Amla for Hair : केस गळणं खूप वाढलंय? आवळ्याचा असा करा वापर ,७ दिवसात फरक जाणवेल)

त्वचेत ओलावा टिकवून ठेवा

त्वचेत ओलावा टिकवून ठेवा

शेंगदाणे हे फॅटी ऍसिडचा एक उत्तम स्रोत आहे यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. शेंगदाण्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.

हेही वाचा :  जेवणाआधी खा फक्त इतके बदाम, रक्तातील साखर कधीच वाढणार नाही, कायमचा टळेल डायबिटीजचा धोका

(वाचा :- Benefits of Amla for Hair : केस गळणं खूप वाढलंय? आवळ्याचा असा करा वापर, ७ दिवसात फरक जाणवेल) ​

सूर्याच्या किरणांपासून संरक्षण

सूर्याच्या किरणांपासून संरक्षण

शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन ई असते, जो एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो त्वचेला अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करतो. शेंगदाणा तेल एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे यामुळे त्वचेला मऊ आणि पोषण मिळण्यास मदत होते.

ही काळजी घ्या

ही काळजी घ्या

शेंगदाणे खाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, अन्यथा त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात.

  • शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढू शकते.
  • शेंगदाण्याचे काही दुष्परिणाम असू शकतात जसे खाज सुटणे.
  • जास्त खाल्ल्याने पित्त नलिकांची समस्या होऊ शकते.(टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

झिंकचे प्रमाण जास्त

झिंकचे प्रमाण जास्त

शेंगदाण्यामध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते, जे कोलेजनचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते, कोलेजन त्वचा तरुण ठेवते. शेंगदाणे हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …