काचेसारख्या नितळ त्वचेसाठी ऋजुता दिवेकर यांनी सांगितलेले ‘हे’ सोपे उपाय करुन पाहाच

वातावरणातील बदलाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. सध्या सर्वकडे थंडीचे वातावरण पाहायला मिळत आहे.अशात डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी त्वचा आणि केसांसाठी काही भन्नाट उपाय सांगितले आहेत. ऋजुता यांचा भर नेहमीच पारंपारिक पदार्थांकडे असतो. अशात ऋजुता यांनी सुंदर केस आणि नितळ त्वचेसाठी त्यांनी काही टिप्स दिल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. (फोटो सौजन्य :- istock, @rujuta.diwekar )

​हंगामी हिरव्या भाज्या

थंडीच्या दिवसात हिरव्या भाज्या येतात. या भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. यामुळे तुमची त्वचेचा पोत सुधण्यास मदत होईल. फळभाज्या पालेभाज्याचा वापर करा. यामुळे तुमची पाचनक्रिया चांगली होण्यास मदत होईल. याचा परिणाम त्वचेवर दिसून येईल. (वाचा :- तुमच्या ‘या’ एका चुकीमुळे वाढू शकतात तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, आजच सोडून द्या ही वाईट सवय)

​गुळापासून बनलेले लाडू

हिवाळ्यात तापमान थंड होते त्यामुळे या काळात गुळापासून बनलेले लाडू चिक्की यांचे सेवन करा. या गोष्टींमुळे तुमच्या त्वचेला फायदा होईल. त्याच प्रमाणे गुळामुळे शरीरात लोहाचे प्रमाण देखील वाढते. (वाचा :- मुलीच्या प्लास्टिक सर्जरीच्या दाव्यावर काजोल स्पष्टच बोलली म्हणाली… )

हेही वाचा :  केसांना मोहरीचे तेल लावताना ही चूक कधीही करू नका, फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल | never do these mistakes during apply mustard oil on hair prp 93

हे सोपे उपाय करुन पाहा

​आवळ्याचा वापर

केसांच्या वाढीसाठी आणि त्वचेसाठी आवळा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमच्या आहारात आवळ्याचे सरबत, लोणचे किंवा आवळा कॅन्डीचा वापरा करा. यामुळे केसगळतीची समस्या तर दुर होईल पण नविन केस येण्यास मदत होईल. (वाचा : – Juice for Glowing Skin : वेटलॉस सोबतच डाग विरहित, चमकदार त्वचा हवी असेल तर हे ४ ज्युस ठरतील वरदान)

​च्यवनप्राशचा करा वापर

थंडीच्या दिवसात च्यवनप्राश खाणं देखील फायदेशीर असू शकतं. यामुळे केस वाढण्यास मदत होईल. त्याच प्रमाणे त्वचा आतून उजळू लागेल. (वाचा :- केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय, केस भराभर वाढतील)

​मोहरीच्या तेलाची मालीश

थंडीच्या दिवसात मोहरीच्या तेलात काही मेथीचे दाणे भिजवून हे तेल केसाच्या मुळांना लावा.याचे चमत्कारीक फायदे पाहायला मिळतात.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …