हेअर स्ट्रेटनिंगनंतर केसात वाढतोय फ्रिजीनेस, वापरा या सोप्या ट्रिक्स

केसांची काळजी हा प्रत्येक महिलांसाठी खरं तर अत्यंत संवेदनशील विषय आहे. केसगळती, लवकर केस पांढरे होणे, केसांची वाढ न होणे, केसात अधिक गुंता होणे यासारख्या अत्यंत कॉमन समस्या आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर केसांची काळजी घेताना अनेक जण केसांचे स्ट्रेटनिंगही करतात. फॅशनेबल दिसण्यासाठी एकदा हेअर स्ट्रेटनिंग केले की त्याची काळजी घ्यावी लागते. हेअर स्ट्रेटनिंगनंतर बऱ्याचदा केस कोरडे होण्याची आणि त्यामध्ये फ्रिजीनेस अधिक होण्याची समस्या निर्माण होते. यासाठीच आम्ही काही ट्रिक्स शेअर करत आहोतय लिव्ह इन ट्रिटमेंट, मॉईस्चराईजिंग शँपू अथवा कंडिशनरचा उपयोग करणे अथवा केसांमध्ये ह्युमिडिटी तपासून पाहणे हे सोपे उपाय तुम्हाला केसांच्या फ्रिजीनेसपासून दूर राहण्यास मदत करतात.

योग्य शँपू आणि कंडिशनरचा वापर

हेअर स्ट्रेटनिंग केल्यानंतर जर तुम्हाला कोरडेपणा अथवा फ्रिजीनेस थांबवायचा असेल तर त्याची सुरूवात ही केस धुण्यापासूनच करायला हवी. यासाठी एक चांगल्या मॉईस्चराईजिंग शँपूची आणि कंडिशनरची निवड करून त्याचा उपयोग करून घ्यावा. यामुळे कोरड्या केसांना हायड्रेशन मिळते, जे नंतर केसांचा फ्रिजीनेस नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरते. केसांना योग्य पोषण देणाऱ्या उत्पादनांचा वापर करूनच केसांचा फ्रिजीनेस तुम्ही घालवावा.

हेही वाचा :  नखांना नखं घासल्याने खरंच केस वाढतात का ? जाणून घ्या खरं उत्तर

(वाचा – सफेद केसांनी हैराण आहात ? मग काळ्याभोर केसांसाठी हे घरगुती उपाय कराच, वयाच्या ४० व्या वर्षीही विशीतील वाटाल)

योग्य टॉवेलचा वापर

केस धुतल्यानंतर सुकविण्यासाठी आपण टॉवेलचा वापर करतो. मात्र साधारण आणि कोणताही टॉवेल हा केसात फ्रिजीनेस उत्पन्न करण्यासाठी अधिक मोठी भूमिका बजावतो. टॉवेल केसांच्या बटांमध्ये फ्रिक्शन निर्माण करतात आणि त्यामुळे केस कोरडे आणि फ्रिजी होतात. याासाठी मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करा. या टॉवेलमुळे केस मऊ – मुलायम राहतात आणि केसांमधील अधिक पाणी हा टॉवेल उत्तमरित्या शोषून घेतो.

(वाचा – ब्लॅकहेड्समुळे नाक दिसते घाण, लावा ओट्सचा घरगुती मास्क!)

फ्रिझ फायटिंग लिव्ह इन ट्रिटमेंट निवडा

फ्रिजीनेसपासून वाचण्यासाठी केस योग्य पद्धतीने स्ट्रेट करून घेणे गरजेचे आहे. हेअर स्ट्रेटनिंग करण्यापूर्वी केसांना व्यवस्थित मॉईस्चराईज करून घ्या. फ्रिज फायटिंग लिव्ह इन ट्रिटमेंट तुमच्या आऊट लेअर क्युटीकल्सचे हायड्रेशन बंद करून मॉईस्चराईज करण्यास मदत करते. तसंच या ट्रीकमुळे केस कोरडे होत नाहीत आणि केस फुलण्यापासूनदेखील वाचतात.

(वाचा – Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

हेही वाचा :  तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? मुळव्याध होऊ नये म्हणून करा हे उपाय

सेक्शनमध्ये करा स्टाईलिंग

तुम्हाला हेअर स्ट्रेटनिंग अधिक काळ टिकायला हवे असेल तर तुम्ही अधिक केस एकत्र न घेता, लहान लहान भाग घेऊन अर्थात सेक्शन करून हेअर स्ट्रेट प्रक्रिया करून घ्या. मोठे आणि कुरळ्या केसांसाठी सेक्शन क्लिरच्या मदतीने हेअर स्ट्रेटनिंग करून घ्या. यामुळे स्ट्रेट हेअर लुकही चांगला मिळतो आणि त्याशिवाय केसांमध्ये फ्रिजीनेस येत नाही. तसंच केस लवकर कोरडेही होत नाहीत.

(वाचा – चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त आहात ? मग हे काम करा वेदनाशिवाय मिळेल आराम, करीना कपूर देखील वापरते हा जालिम उपाय)

हेअर जेल अथवा हेअर स्प्रे वापरा

तुमचे केस स्ट्रेट करून झाल्यानंतर लाँग लास्टिंग राहण्यासाठी नेहमी हेअर जेल अथवा स्प्रे चा वापर करावा. आपल्या केसांचा फ्रिजीनेस आणि कोरडेपणा काढून टाकण्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरते. तसंच जेल केसांना फ्रीझ फ्री आणि स्मूद फिनिश लुक देण्यास मदत करते.

या ट्रिक्स अतिशय सोप्या आहेत. यामुळे केसांतील फ्रिजीनेस राहात नाही आणि तुमचा लुक अधिक आकर्षक दिसण्यास मदत मिळते.

(फोटो क्रेडिटः Canva)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘आनंद दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या संपत्तीची…’, CM एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde on Uddhav Thackeray: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या निधनानंतर मी उद्धव ठाकरेंना …

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यू

Palghar News Today: मे महिन्यात शाळ- कॉलेजना सुट्ट्या लागतात. त्यामुळं अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. पालघर …