Kamlesh Sawant : साळगावकरला मारहाण केल्याने चाहते गायतोंडेवर संतापले

Kamlesh Sawant On Drishyam : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ ( Drishyam 2) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांसोबत सहाय्यक भूमिकेत असणारे कलाकारदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या सिनेमात पोलिस अधिकारी गायतोंडेंच्या भूमिकेत असणारा अभिनेता कमलेश सावंतचे (Kamlesh Sawant) एकीकडे कौतुक होत आहे. तर दुसरीकडे त्याला धमक्या आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल्सचा सामना करावा लागला.

‘दृश्यम’मध्ये गायतोंडेने साळगावकर कुटुंबाला मारहाण केली आहे. त्यामुळेच त्याच्यावर प्रेक्षक भडकले आणि त्याला त्याच्या कामाची पोचपावती मिळाली. यासंदर्भात भाष्य करताना कमलेश सावंत म्हणाला,”साळगावकर कुटुंबाची मारहाण केल्याने प्रेक्षक खूप भडकले होते. माझ्या एका पोस्टवर एका नेटकऱ्याने बाहेर भेटलास तर कुत्र्सासारखा मारेन, अशी कमेंट केली होती. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे”. 


News Reels

कमलेश पुढे म्हणाले,”एका व्यक्तीने मला फोन करत आई-बहिणीवरुन शिवीगाळ केला होता. शिवी देण्याचा प्रकार मला आवडलेला नसल्याने मी त्या संबंधित व्यक्तीला ब्लॉक केलं. तरीही त्या व्यक्तीने मला पाच वेळा फोन केला. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. हे एक वेगळ्या प्रकारचं प्रेक्षकांचं प्रेम आहे”. 

हेही वाचा :  स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच : कंगना रनौत

लवकरच येणार ‘दृश्यम 3’ (Drishyam 3)

‘दृश्यम’चा पहिला भाग पसंतीस उतरल्याने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दुसऱ्या भागानेदेखील चांगलीच कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने 190 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील प्रदर्शित होणार आहे. अभिषेक पाठकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

संबंधित बातम्या

Drishyam 2: 200 कोटींच्या क्लबमध्ये होणार दृश्यम-2 ची एन्ट्री? जाणून घ्या कलेक्शन



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …