नव्या वर्षाचे हे 3 हेल्थ रिझोल्यूशन कधीच पूर्ण होणार नाहीत, ऋजुता दिवेकरने सांगितली यामागची कारणे

2023 हे नववर्ष उजाडलं या नवीन वर्षांत संकल्प करायचे अनेकांचे राहून गेले असतील. किंवा जर संकल्प केले असतील तर ते तपासून पाहण्याची आताच वेळ आहे. चार दिवसांपूर्वीच तुम्ही हेल्दी लाईफचा संकल्प केला असेल तर तो चुकीचा तर नाही ना हे तपासून पाहा. आणि यासाठी लोकप्रिय न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर नक्कीच तुम्हाला मदत करेल.

ऋजुता दिवेकरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तीन महत्वाच्या टिप्स न करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही वजन कमी करणे किंवा हेल्दी, फिट राहण्याचा संकल्प केला असेल तर हे तीन मुद्दे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचे आहेत.

​मी ठराविक गोष्ट पूर्णपणे बंद करेन

मी पूर्णपणे बंद करेन… अशा पद्धतीचा संकल्प अजिबातच करू नका. म्हणजे मी पूर्णपणे भात बंद करेन किंवा मी पूर्णपणे साखर बंद करेन. कारण तुम्ही जो संकल्प केलाय जो अगदी तुमच्या कालच्या वागणुकीपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे असा टोकाचा निर्णय किंवा संकल्प करू नका. कोणतीही गोष्ट पूर्णपणे बंद करण्यापेक्षा ती हळूहळू स्विकारण्याचा प्रयत्न करा. जसे की, बाहेरचे अन्न टाळून पूर्णपणे घरचा हेल्दी आहार सुरू करा.

हेही वाचा :  मधुमेह, उच्च रक्तदाबाला घरचं जेवणच जबाबदार, किचनमध्येच दबा धरून बसलेत शत्रू

(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितले 5 एनर्जी बूस्टर फूड, इम्युनिटी पॉवरसाठी सगळ्यात बेस्ट)

मी दररोज व्यायाम करेन

मी दररोज व्यायाम करेन किंवा चालायला जाईन… हा विचारच सद्यस्थितीला धरून नसेल तर तो कसा पूर्ण होईल. जर तुमचं शेड्युल अतिशय कामांनी व्यस्त असेल तर तुम्ही वर्कआऊट आणि व्यायाम कसा करू शकाल. तुम्हालाही माहित आहे की, हे शक्य नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या आठवड्याच शेड्युल करायला हवा. आठवड्यातून तीन दिवस तुम्ही वर्कआऊटला द्या. कधी तरी फक्त चाला. पण तुम्ही हट्ट केलात तर ते अजिबातच होणार नाही.

(वाचा – मुंबईतील गृहिणीने अगदी घरगुती जेवणाच्या मदतीने ५ महिन्यात तब्बल ४० किलो वजन केलं कमी)

ऋजुता दिवेकरने सांगितल्या टिप्स

​वेट लॉस सेट करू नका..

वजन कमी करणे हा काही सट्टा बाजार नाही. त्यामुळे आकड्यांच्या मागे न लागता सुदृढ आरोग्याकडे लक्ष द्या. पूर्णपणे आहार टाळून वजन कमी करणे हा काही पर्याय नाही. अशावेळी वजन कमी करताना एक एक टप्पा गाठत जा. २० ते २५ किलो वजन कमी करण्याचा आकडा गाठण्याचा अट्टाहास करू नका. मेहनत, परिश्रमचंचचा हट्ट ठेवा पण वजन कमी करण्याचा नको. सातत्य ठेवणे महत्वाचं आहे.

हेही वाचा :  बद्धकोष्ठता आणि गॅसच्या त्रासाने हैराण आहात? बाबा रामदेव यांच्या उपयांनी मिळवा कायमची मुक्ती

(वाचा – Winter Food For Weight Loss: जिमला न जाता अगदी घरबसल्या खा हे ५ पदार्थ, वजनात आपोआप दिसेल फरक))



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सांगलीच्या जतमध्ये वाढू लागली दुष्काळची तीव्रता, आटले पाण्याचे स्त्रोत

Sangli Drought: सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये आता पाण्याची टंचाई आणखी भीषण होण्याच्या मार्गावर आहे. उटगी …

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …