…तर मंत्रिपद काढून घेईन; पंतप्रधानांनी धरले नारायण राणेंचे कान

Narayan rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभेची पायरी चढायला विसरले आहेत, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी टीका केली आहे. नारायण राणे प्रश्नोत्तराच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत, असेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे. नारायण राणे यांच्या स्वीय सहाय्यकाने (PA) अनेकांना गंडे घातल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांना समज दिल्याचेही विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी कोकणात कणकवली येथे एका कार्यक्रमात बोलताना याबाबत भाष्य केले. या कार्यक्रमाला राऊत यांच्यासह आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवणकर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी विनायक राऊत यांनी मंचावरूनच नारायण राणेंवर निशाणा साधला.

काय म्हणाले विनायक राऊत?

“मध्यल्या काळात त्यांनी एक पीए ठेवला होता. या पीएची काम ही फक्त पटवापटवीची होती. अनेकांना त्याने गंडा घातला. मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी नारायण राणेंना झापलं होतं,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.

हेही वाचा :  या चित्रात जे दिसेल त्यावरून ठरेल तुमचा स्वभाव..तंतोतंत जुळतोय अंदाज..पाहा तुम्हाला काय दिसतंय?

नारायण राणेंना प्रश्नच समजला नाही

“लोकसभेच्या अधिवेशनात केरळच्या एका खासदाराने नारायण राणे यांना सभागृहात प्रश्न विचारला होता. याबाबत सभागृहात नारायण राणे यांची खिल्ली उडवण्यात आली होता. केरळच्या खासदाराने इंग्रजीत प्रश्न विचारला होता. त्यावेळी नारायण राणे हेडफोन घालत होते. त्यांनी इंग्रजी प्रश्नाचे हिंदीत भाषांतर केले पण नारायण राणेंना तो प्रश्न अजिबात समजू शकला नाही, असेही विनायक राऊत म्हणाले.

नारायण राणेंना फडणवीस शब्दही नीट उच्चारता येत नाही

“नारायण राणे यांना मालवणी आणि मराठी नीट कसे बोलावे हे आधीच माहित नाही. त्यांना फडणवीस हा शब्दही नीट उच्चारता येत नाही, हिंदी बोलणे तर लांबच राहिले. त्यामुळेच तो प्रश्न त्यावेळी समजला नाही आणि केरळऐवजी ते तामिळनाडूबद्दल बोलत राहिले. यामुळे त्यांची खूप फजिती झाली होता. त्यानंतर नारायण राणे कधीही लोकसभेची पायरी चढले नाहीत,” असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

दोन वर्षापूर्वी नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान

7 जुलै 2021 रोजी नारायण राणे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. यावेळी नारायण राणे यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळात मोठा फेरफार करण्यात आल्यानंतर 36 नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील 4 मंत्र्यांनाही स्थान देण्यात आले होते.

हेही वाचा :  पावसाळी अधिवेशन याच आठवड्यात संपवणार? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …