Trending News : हाजी जानच्या घरी 60 व्या मुलाचा जन्म, 100 मुलांचं टार्गेट

Trending News : जगातील सर्वात मोठं कुटुंब भारतात आहे. मिझोरममध्ये (Mizoram) असणाऱ्या या कुटुंबात तब्बल 181 जण आहेत, जिओना चाना असं कुटुंब प्रमुखाचं नाव असून त्याच्या 39 पत्नी, 94 मुलं, 14 सुना आणि 33 नातवंडं आहे. आता असंच एका कुटुंबाची सध्या जोरदार चर्चा आहे. जान मोहम्मद ( haji jaan mohammad) असं या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचं नाव असून त्याच्या घरी नुकतंच 60 मुलाने जन्म घेतला. (pakistan haji jaan mohammad father of 60 children)

तीन पत्नी, साठ मुलं
जान मोहम्मद हा पाकिस्तानमधल्या (Pakistan) बलूचिस्तानची (Balochistan) राजधानी क्वेटामध्ये राहतो. हाजी जान यांच्या पाच मुलांचा मृत्यू झाला, तर 55 मुलं जिवंत आहेत. हाजी जान यांची तीन लग्न झाली असून त्यांनी 100 मुलांचं टार्गेट ठेवलं आहे. इतकंच नाही तर ते चौथं लग्न करण्याचाही विचार करत आहेत. 50 वर्षांचे सरदार जान मोहम्मद खान खिलजी हे क्वेटा (Quetta) शहरातल्या इस्टर्न बायपासजवळ राहतात. व्यवसायाने ते डॉक्टर असून राहत्या घराजवळच त्यांचं क्लिनिक आहे. 

हाजी जान यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला असून हे त्यांचं 60 वं अपत्य आहे. मुलाचं नाव त्यांनी खुशहाल खान असं ठेवलं आहे. आपल्या गरोदर पत्नीला ते उमरासाठी घेऊन गेले होते, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव खुशहाल खान असं ठेवलं आहे. 

हेही वाचा :  Cidco Lottery 2023 : सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी आता घरे

मुलांची नावं लक्षात राहतात?
इतक्या मुलांची नावं लक्षात राहतात का? असा प्रश्न हाजी जान यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी हसत हो असं उत्तर दिलं. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत पाकिस्तानचा पहिल्या आठ देशांमध्ये समावेश होतो. 

हाजी जान चौथ्या लग्नाच्या तयारीत
हाजी जान यांची तीन लग्न झाली आहेत, आणि आता ते चौथ्या लग्नाच्या तायरीत आहेत. यासाठी ते मुलगी शोधतायत. आपल्यासाठी मुलगी शोधण्याची विनंती आपल्या काही मित्रांना केल्याचं हाजी जान सांगतात. लवकरच आपलं चौथं लग्न होईल असंही ते सांगतात. आणखी मुलं हवी आहेत ही केवळ आपली इच्छा नाही तर आपल्या पत्नींनाही आणखी अपत्य हवी आहेत. हाजी जान 55 मुलांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. 
हाजी जान यांच्या काही मुला-मुलींचं वय हे 20 वर्षांच्या आसपास आहे, पण अजून कोणत्याही मुलांचं लग्न झालेलं नाही, सध्या ही सर्व मुलं शिक्षण घेत आहेत.

हे ही वाचा : Shahid Kapoor चा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा पत्नी Mira अशी दिसत होती, Photo व्हायरल

 

टुंबाला महागाईचा फटका
हाजी जान यांचा मोठा उद्योग नाहीए, क्लिनिकच्या माध्यमातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी सांगितलं पहिल्या मुलाच्यावेळी पैशांचा तुटवडा जाणवला नाही. पण गेल्या तीन महिन्यात महागाईने उच्चांक गाठला आहे, त्यामुळे कुटुंबालाही आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतोय. गेल्या तीन वर्षात पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे आणि याचा फटका आम्हालाही बसत असल्याचं हाजी जान म्हणतात.

हेही वाचा :  'त्या' पोलीस कर्मचाऱ्याला अटक करुन आणा'; कोर्टाने दिले आदेश

आपल्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण देण्याची इच्छा हाजी जान बाळगून आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी त्यांनी कधीच कोणाकडे मदत मागितली नाही, आपल्या मेहनतीच्या जोरावर ते कुटुंबाचा सर्व खर्च पूर्ण करतात. आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणासाठी ते खर्चही करतात. हाजी जान यांना फिरस्तीचा छंद आहे, आपल्याला सर्व मुलांना संपूर्ण पाकिस्तान फिरवून आणण्याचं त्यांचं स्वप्न आहे. कुटुंब लहान होतं,त्यावेळी ते आपल्या मुलांना कारमधून फिरवायचे, पण आता इतक्या मुलांना कारमधून फिरवणं शक्य नसल्याचं ते म्हणतात. 

हाजी जान यांच्याबरोबर बलूचिस्तानमध्येच राहाणारे अब्दुल मजीद मेंगल यांनीही सहा लग्न केली असून त्यांना 54 मुलं आहेत. अब्दुल मेंगल यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …