Veena Kapoor : धक्कादायक! घरासाठी मुलाने केली अभिनेत्रीची हत्या

Veena Kapoor : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) यांच्या मुलानेच संपत्तीसाठी त्यांची हत्या केली आहे. मुंबईतील जुहू भागात ही घटना घडली आहे. अभिनेत्री नीलू कोहलीने (Nilu Kohli) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

43 वर्षीय मुलाने 74 वर्षीय अभिनेत्रीची बॅटने मारहाण करत हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह एका बॉक्समध्ये भरून माथेरानच्या (Matheran) जंगलात फेकून दिला. संपत्तीवरून वीणा कपूर आणि त्यांच्या मुलामध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटीं रुपयांच्या फ्लॅटचा ताबा मिळवण्यासाठी मुलाने आईची हत्या केली आहे. 


News Reels

नीलू कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”तु्म्ही यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी डिजर्व्ह करत होता. तुमच्या निधनाने मला प्रचंड वाईट वाटत आहे. मी निशब्द आहे. पण आता एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर तुम्हाला अखेर शांतता मिळाली आहे. जुहू परिसरातील एका बंगल्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे”. 

हेही वाचा :  Nashik Crime : कुणी मारलं चार वर्षाच्या 'अलोक'ला? अनाथ आश्रमाच्या मागे सापडला मृतदेह

नीलू यांनी पुढे लिहिलं आहे,”संपत्तीसाठी मुलाने आईची हत्या केली आणि तो मृतदेह माथेरानच्या जंगलात फेकला. पण अमेरिकेत राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला शंका आली आणि त्याने यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. चौकशीदरम्यान मुलाने पोलिसांना सांगितलं की त्याने बेसबॉलच्या बॅटने अनेक वार करत वीणा यांची हत्या केली”. वीणा यांच्या हत्येमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

संबंधित बातम्या

IPS Amit Lodha : आयपीएस अमित लोढा निलंबित; भ्रष्टाचाराचा आरोप, ‘खाकी’ वेब सीरिजमुळे चर्चेतSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …