विमान विकत घ्याल इतक्या किमतीचा कुत्रा, 16 BMW घेता येतील इतकी महाग मांजर

Richest Pets of the World: घरात कुत्री किंवा मांजर पाळण्याचा (Pet Dog and Cats) अनेकांना छंद असतो. यासाठी आपण चांगल्या जातीच्या प्राण्याची निवड करतो. यासाठी आपण हवी ती किंमतही मोजायला तयार असतो. पण फारतर हजार किंवा जास्तीत जास्त लाखाच्यावर याची किंमत नसते. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल जगात असे काही पाळीव प्राणी आहेत, ज्यांची किंमत चक्क कोटींमध्ये आहे. यातले काही पाळीव प्राण्यांना तर सेलिब्रेटिचा दर्जा आहे. ऑल अबाऊट कॅट्स (all about cats) नावाच्या एका बेवसाईटने नुकसतीच सर्वात महागड्या पाळीव प्राण्यांची यादी जाहीर केली आहे. यात एका पाळीव कुत्र्याची किंमत चक्क हजार कोटींमध्ये आहे. 

हजार कोटींची मांजर
अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट (Taylor Swift) हिच्याकडे स्कॉटिश फोल्ड (Scottish Fold) जातीची मांजर आहे. तिचं नाव ओलिविया बेंसन (Olivia Benson) असं आहे. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ही जगातली तिसरी सर्वात महागडी मांजर आहे. ओलिवायाची किंमत 800 कोटी रुपये इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेली मांजर तर सोशल मीडिया इन्फ्लूएंसर (social media influencer) आहे. तिचं नाव नाला कॅट आहे.  नाला कॅटच्या (NALACAT) नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून तिचे 44 लाख फॉलोअर्स आहे. अहवालानुसार नालाची किंमत 825 कोटीपेक्षाही अधिक आहे. नालाचं नाव गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. 

हेही वाचा :  कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिना मिळणार 10 लाख रुपये

सर्वात महागडा कुत्रा

सर्वात महागड्या कुत्र्यांच्या यादीत अव्वल स्थानावर जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे. याचं नावं Gunther VI असं आहे. या कुत्राचा मालकी हक्क गुंथर कॉर्पोरेशनकडे आहेत. वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या कुत्र्याची किंमत तब्बल 4000 हजार कोटी इतकी आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार महागड्या पाळिव प्राण्यांची यादी इन्स्टाग्राम अनॅलिटिक्सच्या (Instagram Analytics) आधारे बनवण्यात आली आहे. प्रत्येक पाळिव प्राण्याची सोशल मीडिया पोस्टवरुन किती कमाई होते, यावरुन त्यांच्या किंमत ठरवण्यात आली आहे.

ओलिवियाला 20 लाखाहून अधिक लाईक्स
टेलर सिफ्टने 2020 मध्ये ओलिवियाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या फोटोला 20 लाखाहून अधिका लाईक्स मिळीले होते. टेलर स्विफ्ट हिच्या मांजरीबरोबरच अमेरिकेची प्रसिद्ध टीव्ही होस्ट ओप्रा विन फ्रे हिचे पाळिव कुत्रे शॅडी, सनी, लॉरेन, लायला आणि ल्यूक यांचाही महगड्या पाळीव प्राण्यांमध्ये समावेश होतो. या कुत्र्यांची प्रत्येकी किंमत जवळपास 250 कोटी  इतकी आहे. 

जगातील महागड्या पाळिव प्राण्यांची यादी 

पॉमेरियन जातीचा जिकपॉम नावाचा कुत्रा चौथ्या क्रमांकावर आहे. या कुत्र्याची किंमत जवळपास 200 कोटी इतकी आहे. पाचव्या क्रमांकावर जर्मन फॅश डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांची मांजर चॉपटे आहे, तिची किंमत 100 कोटी इतकी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री बेटी व्हाईटच्या कुत्र्याची किंमत 40 कोटी इतकी आहे. 

हेही वाचा :  कर्मचाऱ्याला कामावरुन काढणे कंपनीला पडलं महागात, द्यावी लागणार 12 लाखांची भरपाई

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …