Pakistan : कराची अंधारात गुडूब; 40 टक्के भागातील बत्तीगुल, मोबाईल चार्ज करण्यासाठी लोकांची भटकंती

Karachi Power Outage : पाकिस्तानवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. महागाईने जनता भरडली जात आहे. महागाईचा आगडोंग सुरु असतानाच पाकिस्तानातील (Pakistan ) कराची शहर काल रात्री अंधारात गुडूब झाले होते. ( Karachi Power Outage News ) शहरात 40 टक्के भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक अंधारात चाचपडत होते. मीडिया वृत्तानुसार, पाकिस्तानमधील कराचीमधील अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तांत्रिक बिघाडामुळे हाय टेन्शन (एचटी) ट्रान्समिशन केबल ट्रिप झाली, त्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे नागरिकांना अंधारत राहावे लागले आहे. (Outage Power Outage In Pakistan)

हाय टेन्शन (एचटी) ट्रान्समिशन लाइन ट्रिप झाल्यामुळे कराचीचा सुमारे 40 टक्के भाग पूर्णपणे ब्लॅक आऊट झाला आहे. परिणामी, अनेक ग्रिड स्टेशन्समध्ये ट्रिपिंगही दिसून आले. प्रभावित भागात नुमाईश चौरंगी, सदर, लाइन्स एरिया, संरक्षण गृहनिर्माण प्राधिकरण (DHA), पंजाब कॉलनी, गुलिस्तान-ए-जौहर, कोरंगी यांचा समावेश आहे. मात्र, कराचीच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या के-इलेक्ट्रिक या युटिलिटी फर्मने काहीही माहिती न दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

जानेवारीतही बत्ती गुल

याआधीही जानेवारीमध्येही, पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय ग्रीडमधील वारंवारतेच्या चढउतारांमुळे तीव्र वीज खंडीत झाली होती ज्यामुळे कराची शहर अंधारात गेले होते. नॉर्थ नाझिमाबाद, न्यू कराची, नॉर्थ कराची, लियाकताबाद, क्लिफ्टन, कोरंगी, ओरंगी, गुलशन-ए-इकबाल, सदर, ओल्ड सिटी एरिया, लांधी, गुलशन-ए-जौहर, मलीर, गुलशन-ए- हदीदचे लोक, साइट इंडस्ट्रियल एरिया , पाक कॉलनी, शाह फैसल कॉलनी आणि मॉडेल कॉलनीमध्ये त्रासाला सामोरे जावे लागले. वीज खंडीत झाल्यानंतर लोक कराचीच्या रस्त्यांवर भटकताना दिसले. मूलभूत गरजांची पूर्तता न झाल्यामुळे बहुतांश लोक नाराज झालेले दिसले. मोबाईल चार्ज करण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागली. बत्तीगुल झाल्याने अनेकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला.

हेही वाचा :  अक्षता पडताच नवरदेवाने सुरु केला गोळीबार; नवरीमुलीसह तिच्या आई, बहिणीला ठार केलं अन् नंतर...

पाकिस्तानात मोठा राजकीय गोंधळ आहे. तसेच आर्थिक संकटांशी झगडावे लागत आहे. त्यातच पाकिस्तानमध्ये सोमवारी ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज खंडित झाला. कराचीबरोबरच लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा या शहरांनाही मोठा फटका बसला आहे. ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या या शेजारील देशात गेल्या चार महिन्यांत ही वीज खंडित होणारी दुसरी मोठी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली. नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये मोठा बिघाड झाला आहे. दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. नॅशनल ग्रीडची फ्रिक्वेन्सी सिस्टम पूर्वत करण्यात येत आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘…तर पवारांची औलाद सांगणार नाही’, साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?

Maharastra Politics : सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार …