वॉटर बर्थ थेरपी म्हणजे नेमके काय? कसा होतो बाळाचा जन्म आणि गर्भवतीच्या यातना होतात कमी

देशातील काही भाग असाही आहे जिथे आजही अद्ययावत रूग्णालयं नाहीत आणि सुईणी बाळांचा जन्म होण्यासाठी मदत करतात. अशावेळी वॉटर बर्थ थेरपी अथवा Water Birth Process वापरण्यात येते. पण ही पद्धत आताची नाही तर अगदी पूर्वीच्या काळापासून जेव्हा हॉस्पिटल्स नव्हते तेव्हापासून वापरण्यात येते आहे. आईला कमी त्रास होऊन बाळाचा जन्म व्यवस्थित व्हावा यासाठी ही पद्धत वापरात आणली जाते. अनेक मोठमोठ्या रूग्णालयातही या पद्धतीचा अवलंब केला जातो. नक्की ही वॉटर बर्थ प्रक्रिया काय आहे जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Freepik.com)

काय आहे नेमकी वॉटर बर्थ प्रक्रिया

काय आहे नेमकी वॉटर बर्थ प्रक्रिया
  • वॉटर बर्थ प्रक्रियेच्या वेळी गर्भवती असणाऱ्या महिलेला जेव्हा लेबर पेन सुरू होते तेव्हा तिला पाण्याने भरलेल्या एका मोठ्या टबमध्ये बसविण्यात येते
  • यावेळी महिलेचे शारीरिक पोश्चर असे असते जसे बेडवर आपण मुलाला जन्म देतो. मात्र तिच्या शरीराचा वरचा भाग हा पाण्याच्या बाहेर असतो
  • या दरम्यान टबमधील पाणी भरण्यात येते जे कोमट स्वरूपात असते. यामुळे महिलेच्या शरीरातून लेबर पेनदरम्यान येणारे क्रॅम्प्स कमी होतात. कारण त्यांच्या शरीरातील स्किन सेल्स आणि टिश्यूज सॉफ्ट होतात
  • तसंच पाण्यात राहिल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने महिलांच्या शरीरातील मनाला आराम देणारे असे अँडोर्फिन हार्मोनचे उत्पादन अधिक होते. यामुळे त्यांच्या यातना कमी होतात. अनेकदा त्यांना पेनकिलर्स देण्याचीही गरज भासत नाही
हेही वाचा :  केव्हा आणि कुठे? तुम्हाला माहित आहे जगातल्या पहिल्या मोबाईलची किंमत किती होती

​बाळाला पाण्यात जन्म देणे आईसाठी किती कमी वेदनादायक?​

​बाळाला पाण्यात जन्म देणे आईसाठी किती कमी वेदनादायक?​

सर्वात प्राचीन असणारी ही वॉटर बर्थ प्रक्रिया आणि आयुर्वेदात सांगितल्यानुसार, पाण्यात बाळाला जन्म देण्याची ही प्रक्रिया तुम्ही स्वीकारणार असाल तर जी महिला गरोदर आहे तिला होणाऱ्या लेबर पेनच्या वेदना या साधारणतः ५० टक्के कमी होतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी दरम्यान ही वॉटर बर्थ प्रक्रिया महिलांनी वापरल्यास, बाळाचा जन्म होणे अधिक सोपे होऊ शकते असे डॉक्टरही सांगतात.

(वाचा – वयाच्या ४० व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेताय, तर या गोष्टींची होईल मदत)

​वॉटर बर्थ प्रक्रियेची योग्य पद्धत​

​वॉटर बर्थ प्रक्रियेची योग्य पद्धत​
  • बाळाचा जन्म अशा पद्धतीने करण्यासाठी कितीही मोठा टब वा कितीही पाणी असे असून चालत नाही. यासाठी काही योग्य प्रमाण आणि पद्धती आखून दिलेल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे.
  • तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, वॉटर बर्थ प्रोसेससाठी एक पूल तयार करण्यात येतो, जो २.५ ते ३ फूट लांब असतो आणि त्यामध्ये साधारणतः ३०० ते ४०० लीटर पाणी असते. गर्भवती महिलेच्या शरीराच्या अंदाजाने हा पूल तयार केला जातो
  • गर्भवती महिलेच्या शरीराला आराम मिळावा इतक्याच तापमानाचे पाणी पुलामध्ये ठेवण्यात येते, तसंच कोणत्याही प्रकारची जळजळ न होता तिला आराम मिळावा हाच हेतू असतो. तसंच बाळाची डिलिव्हरी होईपर्यंत या पाण्याचे तापमान समान असणे आवश्यक आहे
हेही वाचा :  ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण..

(वाचा – गर्भधारणेचा विचार करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात)

​महिलांना या पाण्यात कधी जावे लागते?​

​महिलांना या पाण्यात कधी जावे लागते?​

जेव्हा लेबर पेन सुरू होते हे लेबर पेन वाढण्याच्या आधीच ३-४ तास महिलांना पाण्यात बसवले जाते. लेबर पेन सुरू झाल्यावर लगेच बाळाचा जन्म कधीच होत नाही. या पाण्यात महिलांचे लेबर पेन बऱ्याच अंशी कमी होते. तसंच ही प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर आणि नर्स यांच्या देखरेखीखालीच करण्यात येते. सर्वात महत्त्वाचे केवळ वेदनाच कमी होत नाहीत तर बाळाच्या जन्माची प्रक्रिया होण्यासाठीही या प्रक्रियेत कमी वेळ लागतो.

(वाचा – गरोदरपणात तूप खाण्याचे फायदे, किती खावे तूप)

​इन्फेक्शनची भीती नाही​

​इन्फेक्शनची भीती नाही​

जेव्हा तज्ज्ञ बाळाला जन्म देण्यासाठी या वॉटर बर्थ प्रक्रियेचा आधार घेतात तेव्हा बाळ आणि आई या दोघांच्याही जीवाला धोका नसावा हीच काळजी घेतात.

  • या पाण्यात राहिल्याने महिलेचा शारीरिक आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. तसंच यादरम्यान बऱ्याच महिलांचे ब्लड प्रेशर वाढते, तेदेखील नियंत्रणात राहाते
  • बाळ जेव्हा गर्भाच्या बाहेर येते तेव्हा पाण्याचे तापमान योग्य असल्याने अजूनही गर्भातच असल्याचे फिलिंगदेखील बाळाला मिळते
  • तज्ज्ञांच्या मते नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळी मूल फिरणे अथवा नाळेच्या काही समस्यांचा सामना करावाच लागतो. पण वॉटर बर्थच्या वेळी या समस्या होत नाहीत. कारण पाणी आणि पाण्याचे तापमान बाळाला बाहेर येण्यासाठी अधिक सोप्या ठरतात
हेही वाचा :  Superstition : भुताटकीच्या संशयामुळे गाव सोडले; अंधश्रद्धेचा डोकं बधिर करणारा खळबळजनक प्रकार

​काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे​

​काय आहे तज्ज्ञांचे म्हणणे​

नॉर्मल आणि C – Section पेक्षा वॉटर बर्थ प्रक्रिया अधिक सोपी आहे. गरम पाणी गर्भवती महिलांच्या नसांना आराम देऊन तणाव आणि त्रास कमी करते. तसंच बाळाच्या जन्माच्या वेळी योनीचा आकार मोठा करण्यासही याची मदत मिळते. पाण्यात राहिल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील ऑक्सिटोसिन हार्मोन वाढते आणि याचा बाळाच्या जन्मावर चांगला परिणाम होतो.

टीप – सदर माहिती देण्याचा आमचा हेतू ज्ञान वाढविणे आहे. याबाबत अधिक जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की चर्चा करा.

अशाच अधिक लाइफस्टाइल, हेल्थ, फॅशन, ब्युटी, होम डेकोर, रिलेशनशिप, हॅक्स यावरील अधिक माहितीसाठी क्लिक करा maharashtratimes.com

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : मुख्यमंत्र्यांचा मुक्काम, विरोधकांना फुटणार घाम? 15 जागांवर कोण ठरणार सामनावीर?

Maharastra Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) लोकसभेच्या तब्बल 15 …

जगातील 50 श्रीमंत शहरांच्या यादीत भारतातील दोन प्रमुख शहरं; Washington DC लाही टाकलं मागे

Worlds 50 Wealthiest Cities: जगातील सर्वात श्रीमंत 50 शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक …