ट्विंकल खन्नाने तब्बल 2 वेळा तोडलं अक्षयसोबतचं लग्न, कारण..

जर तुम्ही तुमच्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न करत असाल, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही माहित असणे अपरिहार्य आहे. दुसरीकडे, जर तुमचा विवाह पालकांच्या संमतीने होत असेल तर तुम्हाला जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि नापसंती जाणून घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. हे देखील एक कारण आहे की बहुतेक लोक लग्नाच्या तारखेपासून लग्नाच्या शुभ मुहूर्तापर्यंत एकमेकांना जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. साखरपुडा आणि लग्नादरम्यानचा काळ हा प्रत्येक वधू-वरांसाठी केवळ गोल्डन काळच नसतो तर या काळात दोन लोक एकमेकांना समजून घेतात आणि एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात.

पण काही लोक आपल्या जोडीदाराबरोबर लगेच मनमोकळेपणाने वागू लागतात पण काही लोकांसाठी हे फार काही सोपे नसते, ज्यामुळे काहीवेळा सर्वकाही व्यवस्थित सुरू असतानाही नाते तुटते. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हे देखील अशा जोडप्यांपैकी एक आहेत ज्यांनी एकदा नव्हे तर दोनदा लग्न करण्याचा निर्णय मागे घेतला होता. (फोटो साभार -इंडिया टाइम्स/ट्विंकल खन्ना इंस्टाग्राम)

साखरपुड्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली ट्विंकल

खरं तर, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची पहिली भेट फिल्मफेअर मॅगझिनसाठी केल्या गेलेल्या फोटोशूट दरम्यान झाली होती. जिथे अक्षय ट्विंकलला पाहून तिच्या प्रेमात पडला होता. या मॅगझिन शूटनंतर अक्षय-ट्विंकलचा ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. याच दरम्यान दोघांची एंगेजमेंट झाली. पण काही मतभेदांमुळे साखरपुडा मोडण्यात आला. पण नंतर अक्षय व ट्विंकलने कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने पुन्हा एकदा दुस-यांदा साखरपुडा केला. मात्र, दुस-यांदाही एंगेजमेंट तुटल्यानंतर गोष्टी इतक्या पुढे गेल्या की अक्षयमुळे ट्विंकल डिप्रेशनमध्ये जगू लागली. याचा उल्लेख करत ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये ट्विंकल म्हणाली की, ‘एका मित्राच्या आईने माझ्या आईला (डिंपल कपाडियाला) सांगितले की अक्की म्हणजेच अक्षय कुमार गे आहे, त्यानंतर आमच्या नात्यात आणखीनच अडचणी निर्माण झाल्या होत्या. माझ्या मित्रालाही असं वाटणं आईसाठी धक्कादायक होतं. हे ऐकून आईने लग्नाला साफ नकार दिला.

हेही वाचा :  Maratha Reservation : कुठल्या आधारावर आरक्षण दिलं? रोहित पवारांना का वाटते भीती? म्हणाले...

(वाचा :- माझ्या बायकोची ही 1 घाणेरडी सवय मला व माझ्या आई-बाबांना सहन करणं महाकठीण झालंय, मी घटस्फोट घेणं योग्य ठरेल का?)

प्रेमासाठी अक्षयने दिली सत्वपरीक्षा

मात्र, वर्षभरानंतर अक्की समलिंगी नसल्याची खात्री पटल्यावर ट्विंकलच्या आईने लग्नाला होकार दिला. दरम्यान, अक्षयला मूल होऊ शकते की नाही याचा शोध लावण्यासाठी ट्विंकलच्या आईने (डिंपल कपाडिया) जेनेटिक टेस्ट देखील करायला लावली. या सगळ्या गोष्टींचा अक्षयलाही खूप राग आला, पण अक्षय आणि ट्विंकल दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की त्याने सारं काही हसत हसत केलं. आपल्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न करण्यासाठी अक्षयला इतक्या सत्वपरीक्षा द्याव्या लागलेल्या. असो, ही झाली अक्षय कुमारची गोष्ट. पण लग्नाआधी मुलगा-मुलगी यांचा अति मोकळेपणाही त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतो हेही लक्षात घेण्यासारखेच आहे.

(वाचा :- कोणालाच नाही अशी घाणेरडी सवय नव-याला आहे, त्या एका सवयीने केलंय माझ्या आयुष्याचं वाटोळं, ऐकून येईल अंगावर काटा)

आपल्या लिमिट्स लक्षात ठेवा

असे होऊ शकते की तुमची वागणूक तुमच्या जोडीदारापेक्षा जास्त हसती-खेळती किंवा फ्री असेल, परंतु नेहमी लक्षात ठेवा की असं कधीच वागू नका ज्यामुळे आयुष्यभर तुम्हाला आणि कुटुंबियांना त्रास सहन करावा लागेल. अक्षय कुमारच्या बाबतीतही तेच झालं. ट्विंकलच्या मित्राने गंमतीगंमतीमध्ये सारं काही केलं पण हे सारं अक्षय व ट्विंकलसाठी खूप भयंकर ठरलं. मित्राच्या एका चुकीमुळे दोघांचे लग्नही तुटले. प्रेमविवाह असो किंवा कुटुंबाच्या संमतीने झालेला विवाह असो, अनेकदा घरातील सदस्य तुमच्या स्वभावावरून तुम्हाला जज करत असतात. या काळात तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टीही बारकाईने पाहिल्या जातात. त्यामुळे या काळात खूपच सावधगिरी बाळगली पाहिजे.

हेही वाचा :  '....तुमची मस्ती चालणार नाही', अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम

(वाचा :- मोहम्मद रफींच्या बायकोचा चुकूनही होत नाही कुठेच उल्लेख, आकंठ प्रेम असतानाही का पुसलं गेलं नशिबातून बायकोचं नाव)

एकमेकांचा मान-सन्मान ठेवा

एंगेजमेंटनंतर मुलगा आणि मुलगी यांच्या भेटीगाठी वाढणे खूप सामान्य आहे. लग्न ठरले असेल तर भेटीगाठी घेतल्यानंतरच एकमेकांना ओळखणे सोपे होते. पण कधी कधी जास्त भेटणं हे नात्यासाठी त्रासदायक होऊन बसू शकतं. याचे कारण असे की जेव्हा मुले आपल्या जोडीदारासोबत कम्फर्टेबल होतात तेव्हा ते मुलीला छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडवायला लागतात. इतकंच नाही तर फ्रेंडली होण्याच्या प्रक्रियेत ते आपल्या जोडीदाराचा आदर करणंही विसरतात, त्यामुळे नातं बऱ्याच अंशी बिघडतं. त्यामुळे जोडीदाराशी जास्त फ्रेंडली होताना त्याचा अनादर होणार नाही याची पदोपदी काळजी घेतली पाहिजे.

(वाचा :- माझी कहाणी : मी बायकोची फसवणुक करतोय, एकाच घरात राहून बायकोच्या मोठ्या बहिणीसोबत मी असं काही केलं की….!!)

जसे आहात तसेच राहा

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघांचेही एकमेकांशी खास नाते आहे. अक्षय त्याच्या रोमँटिक भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत असतो, तर ट्विंकल एक लेखिका आणि व्यस्त आई असण्यासोबतच तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. जरी प्रेम-संबंध आणि वैवाहिक जीवनाबद्दल त्यांची विचारसरणी एकमेकांपेक्षा खूप वेगळी असली तरीही त्यांचे नाते मजबूत आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अक्षय-ट्विंकल आजपर्यंत बदललेले नाही. आयुष्यात इतक्या चढ-उतारानंतरही ट्विंकलवरचं अक्षयचं प्रेम कधीच तसुभरही कमी झालं नाही. उलट बहुतेकदा असे दिसून येते की एंगेजमेंटच्या आधी जेव्हा लग्न पक्के होत असते तेव्हा काही मुलं आपण किती चांगले आहोत हे दाखवण्याचं फक्त नाटक करतात. अशा परिस्थितीत जेव्हा तो लग्न झाल्यानंतर त्याचे खरे रंग दाखवतो तेव्हा प्रकरण बिघडतं व गोष्ट नातं तुटण्यापर्यंत जाते.

हेही वाचा :  ही बोल्ड मुलगी बॅकलेस ड्रेस घालून उतरली रस्त्यावर अन् चाहते झाले घायाळ, सोशल मीडियावर घातला अक्षरश: धुमाकूळ!

(वाचा :- माझी कहाणी : लग्न करून मी उद्धवस्त झालीये, नव-याची वागणुक अशीच राहिली तर मी लवकरच पागल होईन, कशी सुटका मिळवू?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, ‘वकिली करणाऱ्यांनी..’

Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी …

‘राज ठाकरेंचे देव बदलू शकतात, ते नकली अंधभक्त! त्यांनी वेळ काढून..’; राऊतांचा टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्मा सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नकली अंधभक्त आहेत, असा टोला …